शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  दोन दुचाकींचा अपघात, दोन ठार, १ अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:36 IST

मागे राहिलेल्या मित्रांना शोधण्यासाठी उलटा प्रवास सुरू करणारे दुचाकीस्वार आपल्या मित्रांच्याच दुचाकीवर आपटल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे घडली.

ठळक मुद्दे दोन दुचाकींचा अपघात, दोन ठार, १ अत्यवस्थ

रत्नागिरी : मागे राहिलेल्या मित्रांना शोधण्यासाठी उलटा प्रवास सुरू करणारे दुचाकीस्वार आपल्या मित्रांच्याच दुचाकीवर आपटल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे घडली.

यात अनिल विजय शिरोटे आणि रोहीत रावसाहेब शिरोटे हे दोघे ठार झाले. निवास आनंद थोरात अत्यवस्थ आणि दीपक भुपाल शिरोटे किरकोळ जखमी झाले आहेत. हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवळेएकंद येथील रहिवासी असून, ते अंगारकीनिमित्त गणपतीपुळेकडे जात होते.अपघात झाला तेव्हा एक स्कोडा कार मार्गावरच होती. अपघात पाहून त्यांना वाचवण्यासाठी कारचालकाने लगेचच गाडीचे ब्रेक लावल्याने त्यांची गाडी गटारात गेली. त्याला दुखापत झालेली नाही.तासगाव तालुक्यातील कवळेएकंद येथील दीपक शिरोटे, अनिल शिरोटे (२५), निवास थोरात (२६) आणि रोहित शिरोटे (२७) हे चौघेजण दोन दुचाकी घेऊन सोमवारी रात्री आपल्या घरातून बाहेर पडले. रोहित आणि दीपक हे एका दुचाकीवर (एमएच 0८-एम २३७0) होते. अनिल आणि निवास हे दुसऱ्या दुचाकीवर (एमएच १0 - एए - ८0१३) होते. मंगळवारी अंगारकी असल्याने गणपतीपुळे येथे जाऊन देवदर्शन घेण्यासाठी ते निघाले.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते निघाले. पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास अनिल आणि निवास पुढे गेले. रोहित आणि दीपक मागे राहिले होते. ते अजून आले का नाहीत, हे पाहण्यासाठी अनिल व निवास फिरून परत आले. दुर्दैवाने हातखंबा ते निवळीदरम्यानच्या एका पेट्रोल पंपासमोर दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या.

हा अपघात झाला तेव्हा एक स्कोडा कार निवळीहून हातखंब्याकडे जात होती. अपघात झाल्यामुळे कारचालकाने आपल्या गाडीला अचानकच ब्रेक लावला. त्यात ती कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात गेली. अपघातात दीपक शिरोटे यांना किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे हे अपघात होताच क्षणी लगतच्या पेट्रोल पंपात गेले. त्यानंतर नरेंद्र महाराज संस्थानची रूग्णवाहिका घेऊन धनेश केतकर घटनास्थळी पोहोचले. त्यातून सर्वांना जिल्हा रूग्णालयात आणले गेले.मित्र-मित्रच एकमेकांवर आदळलेअपघातग्रस्त चौैघेही तरूण एकाच गावातील आहेत. गणपतीपुळेला जाण्यासाठी ते एकत्रच गावातून बाहेर पडले. या दोघांची एकमेकांशीच टक्कर झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. मित्रच एकमेकांवर आपटल्याने अपघात झाल्याचा प्रकार प्रथमच रत्नागिरीत झाला. 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरीSangliसांगली