शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी  : कोसुंब येथे हळदीची शेती, प्रयोगशील शेतकरी, भातशेतीऐवजी हळद लागवडीवर दिला भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 15:38 IST

शेतीमध्ये अधिक रुची असल्याने वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षीदेखील त्याच उमेदीने आणि जोमाने आपले शेतीचे काम सुरु ठेवलेय ते संगमेश्वर तालुक्यातील कोसुंंब गावातील प्रयोगशील शेतकरी यशवंत जाधव यांनी. शेती क्षेत्रातील प्रयोगशीलतेचा विचार केला तर तरुणांना प्रेरणादायी ठरावं, असं त्यांचे व्यक्तिमत्व.

ठळक मुद्देकोसुंब येथे हळदीची शेती, प्रयोगशील शेतकरीभातशेतीऐवजी हळद लागवडीवर दिला भर

सचिन मोहितेदेवरुख : शेतीमध्ये अधिक रुची असल्याने वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षीदेखील त्याच उमेदीने आणि जोमाने आपले शेतीचे काम सुरु ठेवलेय ते संगमेश्वर तालुक्यातील कोसुंंब गावातील प्रयोगशील शेतकरी यशवंत जाधव यांनी. शेती क्षेत्रातील प्रयोगशीलतेचा विचार केला तर तरुणांना प्रेरणादायी ठरावं, असं त्यांचे व्यक्तिमत्व. पारंपरिकतेला छेद देऊन त्यांनी यावर्षी एक एकर जमिनीत भातशेतीऐवजी हळद लागवडीवर भर दिला आहे.यशवंत जाधव यांनी यापूर्वी आपल्या जमिनीत विविध पिके घेतली आहेत. उन्हाळी शेतीतून बटाटा उत्पादनाचा प्रयोगदेखील त्यांनी यशस्वी केला आहे. बटाटा, तिळाची शेती, सूर्यफुलाची शेती असे नाविन्यपूर्ण प्रयोग करुन त्यांनी त्यात यश मिळवले आहे.

भातशेतीकरिता मनुष्यबळ अधिक लागते आणि मशागत, मशागतीसाठी लागणारा राब तसेच पेरणी, नांगरणी, लावणी, भातकापणी आणि झोडणीचा वर्षभराच्या प्रक्रियेचा विचार करता, सहा ते नऊ महिन्यात होणारे पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

त्यानुसार प्रतिवर्षी यशस्वी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोेगांबरोबरच यावर्षी त्यांनी हळदीचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी १०० किलोपेक्षा अधिक बियाणे बाजारातून खरेदी करुन त्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात हळदीच्या बियाण्याची लागवड केली आहे. ह्यसेलह्ण जातीच्या उच्चप्रतिच्या आणि सुधारीत बियाण्याचा वापर त्यांनी केला आहे.यशवंत यांनी पॉवर हिटरच्या माध्यमातून जमिनीची नांगरट करुन, सर्व वाफे तयार केले आणि या वाफ्यांवर हळदीच्या बियाण्याची लागवड केली. शेणखत, गांडुळखताचा उपयोग त्यांनी या शेतीकरिता केला आहे. ही हळदीची लागवड त्यांनी त्यांच्या हापसूच्या बागेमध्ये झाडांच्यामधील मोकळ्या जागेत केली आहे. त्यामुळे हळदीसाठी दिलेली शेणखत, गांडुळखताची मात्रा ही हापूस झाडांकरितादेखील उपयुक्त ठरणार आहे.यशवंत जाधव यांनी यापूर्वी राजकीय पक्षातून काम करताना गावात विविध विकासकामेदेखील केली आहेत. त्यामध्ये विशेषत्वाने पाणीटंचाईवर मात करणाऱ्या करंबेळे -कोसुंब येथील पाझर तलावाचा उल्लेख करावा लागेल. या पाझर तलावामुळे एप्रिल, मे महिन्यात आटणाऱ्या येथील विहिरींची पाण्याची पातळी वाढली आहे. किंबहुना या तलावामुळे गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. जाधव यांना गावात ह्यजेपी भाऊह्ण नावाने ओळखले जाते.सरीवाफे दुबार पिकांसाठीयशवंत जाधव यांचे वय जरी ७७ वर्षे असले तरीदेखील शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची त्यांची आस आहे. जूनपूर्वी हळदीच्या उत्पादनाकरिता पॉवर टिलरच्या माध्यमातून नांगरणी करुन केलेले सरीवाफे त्यांना दुबार पीक घेण्यासाठी वापरात आणावयाचे असल्याचा मानस जाधव यांनी यावेळी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.बटाट्याचेही उत्पादन घेणारडिसेंबर महिन्यादरम्यान हळदीच्या पिकाचे उत्पादन घेऊन झाल्यानंतर जाधव यांना याच जागेत बटाट्याचे उत्पादन घ्यायचे आहे. म्हणजचे कमी श्रमात एकदा नांगरुन ठेवलेल्या जमिनीत ते दुसऱ्यांदा पीक घेणार आहेत. पडीक जमिनीत कोकणातील तरुणांनी अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी आधुनिक शेती करावी, असे जाधव यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी