मुलींच्या जन्मदरात रत्नागिरी पिछाडीवर
By Admin | Updated: July 9, 2015 23:45 IST2015-07-09T23:45:18+5:302015-07-09T23:45:18+5:30
चिंता वाढतेय : मुलींचा घटता जन्मदर

मुलींच्या जन्मदरात रत्नागिरी पिछाडीवर
श्रीकांत चाळके - खेड -रत्नागिरी जिल्हा सध्या विविध घटनांसाठी अग्रभागी राहिला आहे. विषेशत: मुली आणि महिलांच्या दरहजारी पुरूषांमागे राज्यात नंबर वन असलेल्या याच रत्नागिरी जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराबाबतची अवस्था केविलवाणी झाली आहे. राज्याच्या अन्य जिल्ह्यांप्रमाणेच रत्नागिरीची अवस्था होणार की काय, अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. मुलींचा जन्म दर येथे नंबर वन असला तरीही भवितव्य असलेल्या चिमुकल्यांच्या किलबिलाटात मुलींचा आवाज कमीच होत आहे. जिल्ह्यात एक हजार पुरूषांमागे ११२३ महिला आहेत. चिमुकल्यांमध्ये मुलींचे हे प्रमाण खूपच कमी आहे.
राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच सध्या रत्नागिरी जिल्ह्यातही मुलींचा जन्मदर कमी आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुलींचा जन्मदर चांगला आहे. दर हजारी पुरूषांमागे सध्या महिलांचे प्रमाण राज्यात नंबर १ आहे. गेल्या १० वर्षांत रत्नागिरीतील मुलींचा जन्मदर झपाट्याने घटत आहे. याचा विपरित परिणाम जिल्ह्यातील जन्मदरावर होईल, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.
२००१मध्ये झालेल्या जनगणनेत १ हजार पुरूषांमागे महिलांची संख्या १३३६ एवढी होती, ही समाधानकारक बाब होती. मात्र, त्याचवेळी मुलींचा जन्मदर कमी होत होता. २००१ च्या जनगणनेनुसार ० ते ६ वयोगटातील चिमुकल्यांमध्ये प्रतिहजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण ९५२ होते. आताची परिस्थिती भयानक आहे. १ हजार पुरूषांमागे महिलांचे प्रमाण जास्त असले तरीही ते गेल्या जनगणनेच्या तुलनेत झपाट्याने घटले आहे. हे प्रमाण ११३६वरून ११२३वर आले आहे. मुलींचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. ० ते ६ वयोगटातील चिमुकल्यांमध्ये एक हजार मुलांमागे २०११ च्या जनगणनेनुसार मुलींचे प्रमाण ९२२ वरून ९३६ एवढे असले तरीही दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण कमीच आहे.
मुलींचा जन्मदर हा २००१ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या १२.७९ टक्के एवढा होता़ आता तो ८़ ८१ एवढा खाली आला आहे. अन्य भागात मुलांचे प्रमाण मुलींपेक्षा अधिक आहे.