शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

रत्नागिरी : फिरत्या चाकावर ती हाकतेय संसाराचा गाडा, जोपासला पारंपरिक कुंभार व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 14:04 IST

पालपेणे-कुंभारवाडी येथील रुक्मिणी धोंडू नांदगावकर या वयोवृद्ध महिलेने मातीपासून माठ तसेच विविध वस्तूंना आकार देत आपला पारंपरिक तीन पिढ्यांपासूनचा कुंभार व्यवसाय आजही जोपासला आहे.

ठळक मुद्देफिरत्या चाकावर ती हाकतेय संसाराचा गाडावृध्द महिलेने मातीपासून बनवल्या विविध वस्तूपालपेणेतील रुक्मिणी नांदगावकर यांनी जोपासला पारंपरिक कुंभार व्यवसाय

मंदार गोयथळेअसगोली : पालपेणे-कुंभारवाडी येथील रुक्मिणी धोंडू नांदगावकर या वयोवृद्ध महिलेने मातीपासून माठ तसेच विविध वस्तूंना आकार देत आपला पारंपरिक तीन पिढ्यांपासूनचा कुंभार व्यवसाय आजही जोपासला आहे.

आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात पारंपरिक व्यवसायाकडे दुर्लक्ष होत चालले आहे. आजची तरुण पिढी आपला पारंपरिक व्यवसाय पुढे नेण्यास तयार नसल्याचे दिसून येते. प्रत्येक तरूणाला शहरातील नोकरीची ओढ असते. त्यामुळे विविध पारंपरिक व्यवसाय लोप पावण्याच्या स्थितीत आल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे. गुहागर तालुक्यातील पालपेणे - कुंभारवाडी येथे नांदगावकर कुटुंबियांचा पारंपरिक कुंभार व्यवसाय सुमारे ३ पिढ्यांपासून सुरु आहे. हा व्यवसाय आजही रुक्मिणी धोंडू नांदगावकर या आपल्या वयोवृद्ध अवस्थेत सांभाळत आहेत. या व्यवसायामध्ये त्यांना मुलगा उदय व सून नेहा यांचे सहकार्य लाभत आहे.

आपल्या या कुंभार व्यवसायामध्ये माठ तसेच मातीच्या विविध वस्तू बनवण्याचे काम हे कुटुंब करत आहे. मुळातच माठ बनवणे ही अवघड कला आहे. त्यातही माठ घडवणे अतिशय कठीण काम असून, नेमके हेच काम आजपर्यंत आपला मुलगा व सून यांना तितकेसे प्रभावीपणे जमत नसल्याचे रुक्मिणी नांदगावकर सांगतात.विशेष म्हणजे त्यांच्या या मातीच्या विविध वस्तू अनेक ठिकाणी प्रदर्शनासाठीदेखील गेल्या आहेत. वेळणेश्वर येथील प्रदर्शनात त्यांना रोख ५ हजार रुपयांचे पारितोषिकही देण्यात आले होते.

माठ बनवण्यासाठी मातीला आकार देणे, हे मोठे जिकरीचे काम आहे. परंतु ओल्या मातीत राहून मातीच्या विविध वस्तू घडवण्याचे कौशल्य आपल्या म्हातारपणीही रुक्मिणी नांदगावकर यांनी आजही जोपासले आहे. प्लास्टिकपासून होणारे दुष्परिणाम थांबवण्याकरिता या कुंभार व्यवसायाला नवसंजिवनी मिळणे आज काळाची गरज बनली आहे.आर्थिक पाठबळ हवे..आपला कुंभार व्यवसाय गेल्या कित्येक पिढ्यांपासून सुरु आहे. या व्यवसायात मुलगा व सून यांचे चांगले सहकार्य मिळते. आपण बनवलेल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असते. आर्थिक पाठबळाअभावी पाहिजे तशी गती देता येत नाही, असे त्या म्हणतात. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकRatnagiriरत्नागिरी