शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : शिक्षक बदल्या दिवाळी सुट्टीनंतर, प्रशासनाची धावपळ सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:55 IST

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हातंर्गत शासन निर्णयानुसारच आहेत. या बदल्या दिवाळीच्या सुट्टीनंतर करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे.

ठळक मुद्देशिक्षक बदल्या दिवाळी सुट्टीनंतरप्रशासनाची धावपळ सुरु

रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हातंर्गत शासन निर्णयानुसारच आहेत. या बदल्या दिवाळीच्या सुट्टीनंतर करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे.मागील शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजेच सन २०१७-१८ मध्ये कमी पटसंख्येच्या ८८ प्राथमिक शाळांचे समायोजन अन्य शाळेत करुन त्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन शिक्षक कमी असलेल्या शाळांमध्ये करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. हे

समायोजन करताना जिल्हा परिषदेने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना तालुक्यातच समायोजन करावे, अशी मागणी होती. मात्र, जिल्हा परिषदेने ५० शिक्षकांचे समायोजन जिल्हास्तरावर करण्याचे जाहीर केले होते. त्याला सर्वच शिक्षक संघटनानी जोरदार विरोध केला होता.

दरम्यान, या पूर्वीच्या शासन निर्णयानुसार व्हाव्यात. कारण अगोदर तालुकास्तरावर नंतर जिल्हास्तरावर या बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षकांची आहे. त्याचबरोबर शिक्षक बदल्या निम्मे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर करणार असल्याने अनेक शिक्षकांना कौटुंबिक अडचणी येणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार चिपळूण दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने त्यांना निवेदनाद्वारे २२ आॅक्टोबर २०१८ चा शासन निर्णय रद्द करुन १८ एप्रिल २०११ च्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम तालुकास्तर व नंतर जिल्हास्तरावर बदल्या करण्याची मागणी केली होती.

शासनाने दिलेल्या दि. २२ आॅक्टोबर २०१८ च्या निर्णयानुसारच बदल्या करण्याच्या हालचाली परिषद भवनात सुरु आहे. त्यामुळे शिक्षक बदल्या दिवाळीची सुट्टी संपल्यावर होणार असल्याचे निश्चित आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी