शिव सहकार सेनेचे रत्नागिरी तालुक्याचे पदाधिकारी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST2021-09-13T04:30:25+5:302021-09-13T04:30:25+5:30

शिव सहकारच्या पदाधिकाऱ्यांनी गावागावात केंद्र व राज्य शासनाच्या योजना सहकाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाव्यात व सर्वसामान्य लोकांना त्याचा ...

Ratnagiri taluka office bearers of Shiv Sahakar Sena announced | शिव सहकार सेनेचे रत्नागिरी तालुक्याचे पदाधिकारी जाहीर

शिव सहकार सेनेचे रत्नागिरी तालुक्याचे पदाधिकारी जाहीर

शिव सहकारच्या पदाधिकाऱ्यांनी गावागावात केंद्र व राज्य शासनाच्या योजना सहकाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाव्यात व सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ मिळावा आणि आर्थिकदृष्ट्या बळकट बनविण्यास त्यांना मदत करावी, अशा सूचना अध्यक्षा सरपोतदार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला शिव सहकार सेनेचे महाराष्ट्राचे सचिव संदीप तांबे, सहखजिनदार वनिता देशमुख, रत्नागिरी जिल्हा संघटक गजानन पाटील, रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क संघटक विलास पोतेरे, मुंबई उत्तर-मध्य लोकसभा संघटक संदीप माड्ये, रत्नागिरी तालुका संघटक सुनील नावले, लांजा तालुका संघटक चंद्रकांत शिंदे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत शिव सहकार सेनेच्या रत्नागिरीतील जयगड-वाटद विभागाचे आदेश सुरेश खाडे यांची तालुका सचिवपदी, उपविभागपदी भरत भुवड, कोतवडे उपविभाग संघटकपदी सुनील लोगडे, विद्याधर तांदळे, संदीप कांबळे, दीपक डांगे, अभिजित वैद्य यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

Web Title: Ratnagiri taluka office bearers of Shiv Sahakar Sena announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.