शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : वेध उन्हाळी सुट्ट्यांचे; नियोजन जादा गाड्यांचे,  विभागातून ४६ जादा गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 17:55 IST

शालेय परीक्षा अंतिम टप्प्यात असून, उन्हाळी सुटी १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. खासगी शाळांच्या परीक्षा १३ रोजी संपत आहेत, तर शासनमान्य शाळांच्या परीक्षा १५ रोजी संपणार आहेत. परीक्षेनंतर अनेक विद्यार्थी, पालकांसमवेत गावी येत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी विभागातून ७ एप्रिलपासून एकूण ४६ जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे.

ठळक मुद्देवेध उन्हाळी सुट्ट्यांचे; नियोजन जादा गाड्यांचे विभागातून ४६ जादा गाड्या

रत्नागिरी : शालेय परीक्षा अंतिम टप्प्यात असून, उन्हाळी सुटी १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. खासगी शाळांच्या परीक्षा १३ रोजी संपत आहेत, तर शासनमान्य शाळांच्या परीक्षा १५ रोजी संपणार आहेत. परीक्षेनंतर अनेक विद्यार्थी, पालकांसमवेत गावी येत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी विभागातून ७ एप्रिलपासून एकूण ४६ जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मंडळी नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबईत आहेत. अनेकांची कुटुंब मुंबईत असली तरी सुटीच्या कालावधीत मंडळी गावाकडे येत असतात. कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी जादा गाड्या सुरू केल्या आहेत.

कोकण रेल्वे जिल्ह्यातील वाडी - वस्तीवरील ग्रामस्थांसाठी उपयोगी नसल्यामुळे त्यांना एस. टी.चा आधार ठरतो. त्यामुळे रत्नागिरी विभागाने जिल्ह्यातील काही आगारातील प्रमुख मार्गावर एस. टी. गाड्या सुरू केल्या आहेत.

दापोली ते भार्इंदर, कल्याण, विठ्ठलवाडी, मुंबई, ठाणे, बोरिवली, उंबरघर ते ठाणे मार्गावर ८ गाड्या सोडण्यात येणार आहेत. १३ एप्रिल ते १ मेपर्यंत या गाड्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. खेड ते बोरिवली, खेड ते ठाणे व खेड -पिंपळोली ते मुंबई मार्गावर ३ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. २१ एप्रिल ते ५ मेपर्यंत गाड्यांचे नियोजन केले आहे.

चिपळूण ते चिंचवड, चिपळूण मंजुत्री ते बोरिवली, चिपळूण ते बोरिवली, भांडूप, ठाणे मार्गावर सहा जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. २८ एप्रिल ते १ मेपर्यंत गाड्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. गुहागर ते भांडूप, बोरिवली, चिंचवड, विरार मार्गावर ६ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ७ ते दि. २८ एप्रिलपर्यंत गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.देवरूख ते मुंबई, स्वारगेट, करजुवे ते बोरिवली, देवरूख ते कल्याण, देवडे ते मुंबई, देवरूख ते बोरिवली मार्गावर ७ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. सर्व गाड्या २८ एप्रिल रोजी सोडण्यात येणार आहेत.

रत्नागिरी आगारातून आंबोळगड - मुंबई, रत्नागिरी ते नालासोपारा, निगडी, अक्कलकोट, कोल्हापूर - इस्लामपूर मार्गावर ८ जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. १३ ते २८ एप्रिलअखेर या गाड्या सोडण्यात येणार आहेत.लांजा ते बोरिवली मार्गावर दोन गाड्या १३ एप्रिल रोजी, राजापूर ते नालासोपारा व राजापूर ते पाचलमार्गे पुणे मार्गावर २ जादा गाड्या दि. २१ व २८ एप्रिल रोजी सोडण्यात येणार आहेत. मंडणगड आगारातून केळशी ते नालासोपारा, मंडणगड ते बोरिवली, मंडणगड - दाभट बोरिवली, खरवते ते नालासोपारा मार्गावर ४ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

१३ ते २८ एप्रिलअखेर या गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्यांच्या नियोजनासाठी एस्. टी. महामंडळाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या आणि बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये याची काळजीही घेतली जाणार आहे.ग्रामीण भागाची जीवनवाहिनीग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. वाडीवस्तीवर पोहोचली आहे. रत्नागिरी विभागात ७३४ गाड्या असून, दररोज ४५०० फेºयांव्दारे २ लाख १६ हजार किलोमीटर वाहतूक केली जाते. विभागात १५५० वाहक व १८०० चालक कार्यरत असून, अडीच लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येते.

मे महिन्यात मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. त्यासाठी रत्नागिरी विभागाने यावर्षी ४६ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय दैनंदिन ८७ गाड्यातून मुंबई मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू असून, ती पुढे सुरूच राहणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.वाहक, चालक निश्चितराज्य परिवहन महामंडळाच्या सर्व विभागातून उन्हाळी सुटीसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी विभागाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विभागातर्फे ४६ जादा गाड्यांसाठी ९२ वाहक व ९२ चालक निश्चित करण्यात आले आहेत.आॅनलाईन तिकीट सेवारत्नागिरी विभागातर्फे उन्हाळी सुटीसाठी ४६ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. १५ जूनला शाळा सुरू होणार असल्यामुळे १५ जूनपर्यंत जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येईल.

महामंडळाची आॅनलाईन तिकीट सेवा उपलब्ध आहे. कॅशलेसमुळे रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक व विभागातील अन्य आगारांमध्येही स्वॅपिंग मशीन बसवण्यात आली आहेत.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळा