शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : सागरी महामार्गाचे लवकरच दुपदरीकरण, प्रकल्प आराखडा केंद्र शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:27 IST

करंजा ते आरोंदा या ५५० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्ग दुपदरीकरणासाठी राज्य शासनाकडून २५०० कोटींचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देसागरी महामार्गाचे होणार लवकरच दुपदरीकरणकरंजा ते आरोंदा : २५०० कोटींचा प्रस्ताव केंद्राला सादर

रत्नागिरी : करंजा ते आरोंदा या ५५० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्ग दुपदरीकरणासाठी राज्य शासनाकडून २५०० कोटींचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

सध्याचा अनेक तुकड्यांच्या स्वरुपातील सागरी महामार्ग सलग जोडण्यासाठी त्याची नव्याने बांधणी होणार आहे. या जोडणीत ८२ पूल उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी शासनस्तरावरून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे.येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करंजा ते रेवस - दिघी - जैतापूर - वेंगुर्ला - आरोंदा असा हा ५५० किलोमीटर लांबीचा सागरी महामार्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सागरी महामार्गाचे काम सुरू होते. मात्र, अनेक ठिकाणी नद्या असून, त्यावर पूल न उभारता जेटी उभारून फेरीबोटीच्या सहाय्याने वाहनांना पुढील मार्गावर जावे लागते.त्यामुळे हा प्रवास अडथळ्यांचा ठरत आहे. अनेकदा फेरीबोटीबाबतच्या समस्यांमुळेही सागरी महामार्गावरील वाहतूक बेभरवशी ठरत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठीच सर्व पुलांसहीत हा सागरी महामार्ग तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.कोकणात वाढणाऱ्या सागरी पर्यटनासाठीही सागरी महामार्ग सलगपणे होणे आवश्यक आहे. त्यासाठीच केंद्र शासन स्तरावरून सागरी महामार्ग पहिल्या टप्प्यात नव्याने बांधणी करीत दुपदरी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.करंजा ते आरोंदा किरणपाणी या गोव्याच्या हद्दीपर्यंतचा सागरी महामार्ग कोकणातील पर्यटन विकासासाठीच उभारण्यात आला होता. मात्र अनेक ठिकाणी हा महामार्ग अपुरा तसेच तुकड्यांच्या स्वरुपात आहे. सागरी महामार्गाच्या झालेल्या कामाच्या दर्जाबाबतही अनेकांचे आक्षेप आहेत. आता या महामार्गाची पुनर्बांधणी व दुपदरीकरणासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे.

करंजा ते आरोंदा या संपूर्ण सागरी महामार्गावर ८२ पुल होणार असून त्यातील १८ पुल रत्नागिरी जिल्ह्यात व १० पुल सिंधुदुर्गात होणार आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जात असलेल्या या सागरी महामार्गाच्या उभारणीसाठी ३ एजन्सींचीही नेमणूक केली आहे. ड्रोन कॅमेºयाद्वारे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. 

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी