शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : भात विक्रीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद, आॅनलाईन पेमेंटची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 17:04 IST

महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १४ केंद्रांना भात खरेदीसाठी यावर्षी २२ हजार क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसादामुळे केवळ ७ हजार ९०.०५ क्विंटल खरेदी झाली आहे. यावर्षी आॅनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तरीही शेतकऱ्यांमध्ये भात विक्रीसाठी अनास्था दिसून येत आहे.

ठळक मुद्देभात विक्रीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसादआॅनलाईन पेमेंटची सुविधा- आतापर्यंत केवळ ७ हजार क्विंटल भात खरेदी

मेहरून नाकाडेरत्नागिरी : महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १४ केंद्रांना भात खरेदीसाठी यावर्षी २२ हजार क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसादामुळे केवळ ७ हजार ९०.०५ क्विंटल खरेदी झाली आहे. यावर्षी आॅनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तरीही शेतकऱ्यांमध्ये भात विक्रीसाठी अनास्था दिसून येत आहे.दि महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे दरवर्षी भात खरेदी करण्यात येते. यावर्षीसाठी फेडरेशनला २२००० क्विंटल भात खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना १५५० रूपये प्रतिक्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे.

सन २०१०पासून २०१४ पर्यंत केंद्रांचे गोदामभाडे थकल्यामुळे जिल्ह्यातील १६पैकी पाच केंद्रांवर गतवर्षी भात खरेदी झाली नव्हती. १६पैकी ११ केंद्रांवर ७७७ शेतकऱ्यांकडून एकूण ८ हजार ५५६ क्विंटल भात खरेदी करण्यात आले होते.

गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलला १४७० रूपये दर देण्यात आला होता, शिवाय २०० रूपये बोनस देण्यात आला होता. मात्र, यावर्षी बोनस देण्यात आलेला नाही. आतापर्यंत ७३८ शेतकऱ्यांकडून ७ हजार ९०.०५ क्विंटल भात खरेदी करण्यात आले आहे.खेड तालुका खरेदी - विक्री संघाच्या केंद्रांवर १२९ शेतकऱ्यांनी १ हजार ९६३.२० क्विंटल, गुहागर तालुका खरेदी - विक्री संघाच्या केंद्रावर १११ शेतकऱ्यांनी ६७४ क्विंटल, लांजा तालुका खरेदी - विक्री संघ येथे ६ शेतकऱ्यांकडून २५.६०, रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघ केंद्रांवर ९९ शेतकऱ्यांकडून ८५८.८० क्विंटल, चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ चिपळूण येथे ७० शेतकऱ्यांकडून ८७०.८० क्विंटल, चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, मिरवणे/मार्गताम्हाणे केंद्रावर ३९ शेतकऱ्यांकडून ३०१.६० क्विंटल, आकले केंद्रावर ३७ शेतकऱ्यांकडून २७८ क्विंटल, शिरळ केंद्रावर १७ शेतकऱ्यांकडून १२२ क्विंटल, शिरगाव विविध कार्य सेवा सोसायटी लि. केंद्रावर १११ शेतकऱ्यांकडून १ हजार ६७.२० क्विंटल भात विक्री झाली आहे.

केळशी परिसर आंबा उत्पादक संघाच्या केंद्रावर ६६ शेतकऱ्यांनी ४६३.२० क्विंटल, राजापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या केंद्रावर ३ शेतकऱ्यांनी ४३.६५ क्विंटल भात विक्री केली आहे.रास्तदर धान्य दुकानांवर होणार विक्रीमार्चअखेर भातखरेदी करण्यात येणार आहे. खरेदी केलेल्या भाताच्या भरडाईसाठी ई - लिलाव केला जातो. भाताचा टप्प्याटप्प्याने लिलाव केला जात असल्याने २ हजार ७२८ क्विंटल भाताची भरडाई केली असून, १ हजार ५० क्विंटल तांदूळ प्राप्त झाला आहे. रास्तदर धान्य दुकानातून या तांदळाची विक्री केली जाणार आहे.८७ लाख ६४ हजार ६९२ रूपये वितरितभातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आॅनलाईन पेमेंट मिळणार आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांनी विक्री करणाऱ्या केंद्रावर सातबारा, शेतकऱ्याचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक शिवाय बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड आदी माहिती सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. भात विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यावर पैसे आॅनलाईन जमा होणार आहेत. शेतकऱ्यांनी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन करूनही फारसा प्रतिसाद लाभलेला नाही.कमी भात विक्रीगतवर्षी ७७७ शेतकऱ्यांकडून ८ हजार ५५६ क्विंटल भातविक्री करण्यात आली होती. यावर्षीही गतवर्षीचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. यावर्षी २२००० क्विंटल भात खरेदीचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ ७३८ शेतकºयांकडून ७०९०.०५ क्विंटल इतकेच भात विक्री करण्यात आले आहे.लिलाव प्रक्रिया रखडल्याने विरोध दर्शविला होताभात विक्रीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभतो. मात्र, यावर्षी अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. २००९-१०मध्ये १५ हजार २४०.७३ क्विंटल, २०१०-११मध्ये १५ हजार २६०.२२ क्विंटल, २०११-१२मध्ये १८ हजार ७३१.७८ क्विंटल, २०१२-१३मध्ये २१ हजार ४८० क्विंटल, २०१३-१४मध्ये २४ हजार ४९८.४६ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे.

२०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षी भात खरेदी झालीच नाही. शासनाकडून लिलाव प्रक्रिया रखडल्यामुळे गोदाम मालकांनीच भात खरेदीसाठी नकार दर्शविला होता. परंतु गतवर्षी शासनाच्या परवानगीने भात खरेदी करण्यात आली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी