रत्नागिरीत स्काऊटर राज्य पुरस्कार कार्यशाळा

By Admin | Updated: November 11, 2015 23:53 IST2015-11-11T20:44:47+5:302015-11-11T23:53:25+5:30

एकूण १९ स्काऊटर आणि ५ गाईडर सहभागी झाले होते.

Ratnagiri Skater State Award Workshop | रत्नागिरीत स्काऊटर राज्य पुरस्कार कार्यशाळा

रत्नागिरीत स्काऊटर राज्य पुरस्कार कार्यशाळा

हातखंबा : भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्थेच्यावतीने अध्यात्म मंदिर, रत्नागिरी येथे प्रथमच स्काऊटर - गाईडर राज्य पुरस्कार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये एकूण १९ स्काऊटर आणि ५ गाईडर सहभागी झाले होते.
जिल्हा गाईड संघटन आयुक्त रुपाली सूर्यवंशी, जिल्हा स्काऊट संघटक आयुक्त सुभाष तपासे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त किशोरी कोळेकर, सहाय्यक जिल्हा प्रशिक्षण आयुक्त राजेंद्र खांबे, सहाय्यक जिल्हा आयुक्त दिनेश नाचणकर, राहूल सप्रे, सचिन मिरगल, राजश्री पाटील आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा मुख्य आयुक्त एकनाथ आंबोकर, कोकण विभागप्रमुख तथा राज्य प्रशिक्षण आयुक्त किशोरी शिरकर, रशीदा टेमकर, जिल्हा सचिव हुसेन पठाण आदींनी शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन कर्मचारी अर्पित कडू, विश्वास लिंगराज, नितीन पाडावे, रवींद्र डांगे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Ratnagiri Skater State Award Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.