शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : तीन दिवसांत तीन हजार डझन हापूसची लक्षणीय विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 17:11 IST

रत्नागिरी हापूसला औरंगाबादकरांची विशेष पसंती मिळाल्याने शुक्रवारी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी तब्बल एक हजार डझन आणि एकूण तीन हजार डझन आंब्यांची लक्षणीय विक्री झाली. त्याचबरोबर पुढील वर्षीपासून दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवासाठी आग्रहाचे निमंत्रणही मिळाले आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांत तीन हजार डझन हापूसची लक्षणीय विक्रीऔरंगाबादमध्ये दरवर्षीच होणार हापूसवारी

शोभना कांबळेरत्नागिरी : रत्नागिरी हापूसला औरंगाबादकरांची विशेष पसंती मिळाल्याने शुक्रवारी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी तब्बल एक हजार डझन आणि एकूण तीन हजार डझन आंब्यांची लक्षणीय विक्री झाली. त्याचबरोबर पुढील वर्षीपासून दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवासाठी आग्रहाचे निमंत्रणही मिळाले आहे.शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, या संकल्पनेतून राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने औरगांबाद येथे ३०, ३१ मे आणि १ जून या तीन दिवसांच्या कालावधीत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३ आंबा उत्पादक सहभागी झाले होते.

रत्नागिरी बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी, समितीचे सहाय्यक सचिव सुहास साळवी, सुधाकर कोकीतकर, निरीक्षक अतुल नागवेकर, लिपीक रूपेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश चव्हाण, निवळी, मारूती साळुंखे, करबुडे, दिगंबर मयेकर, पोमेंडी, सुभाष भुवड, डुगवे, गणेश देसाई, दीपक देसाई, नूरमहंमद मुकादम, अर्जुन पाडावे आणि प्रकाश साळवी यांनी आंब्याची विक्री केली.तीन दिवसांच्या कालावधीत झालेल्या या महोत्सवात नैसर्गिक पिकवलेला रत्नागिरी हापूस उपलब्ध झाल्याने रत्नागिरीच्या हापूसची लक्षणीय उचल झाली. या तीन दिवसात हापूसला उत्तम दर मिळालाच पण तब्बल तीन हजार डझन आंब्याची विक्री झाल्याने आंबा उत्पादकही आनंदी झाले असून, पुढीलवर्षी पुन्हा सहभागी होण्याचे ठरवले आहे.आग्रहाचे निमंत्रणरत्नागिरी हापूसला या महोत्सवात चांगली पसंती मिळाली आहे. त्यामुळे याठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढील वर्षी होणाऱ्या महोत्सवासाठी आग्रहाने बोलावले असल्याचे रत्नागिरी बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांनी माहिती देताना सांगितले.

टॅग्स :Alphonso Mangoहापूस आंबाRatnagiriरत्नागिरी