कर्नाटक हापूसमुळे आंब्याचा बाजार उठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 03:08 AM2018-05-28T03:08:40+5:302018-05-28T03:08:40+5:30

पावसाच्या धास्तीने रविवारी मार्केट यार्डमध्ये कर्नाटक हापूस आंब्याची प्रचंड आवक झाली. आवक जास्त आणि मागणी तुलनेत कमी असल्याने कर्नाटक हापूसच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. याचा परिणाम सर्वच आंब्याच्या किमतीवर झाला असून, रत्नागिरी हापूसचे दरदेखील २०० ते २५० रुपये डझनपर्यंत खाली आले आहेत.

 Mango Market Rises From Karnataka Hapus | कर्नाटक हापूसमुळे आंब्याचा बाजार उठला

कर्नाटक हापूसमुळे आंब्याचा बाजार उठला

Next

पुणे - पावसाच्या धास्तीने रविवारी मार्केट यार्डमध्ये कर्नाटक हापूस आंब्याची प्रचंड आवक झाली. आवक जास्त आणि मागणी तुलनेत कमी असल्याने कर्नाटक हापूसच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. याचा परिणाम सर्वच आंब्याच्या किमतीवर झाला असून, रत्नागिरी हापूसचे दरदेखील २०० ते २५० रुपये डझनपर्यंत खाली आले आहेत. तर कर्नाटक हापूस केवळ १०० ते १५० रुपये डझने घालविण्याची वेळ व्यापा-यावर आली आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमुळे ऐन हंगामामध्ये कर्नाटक हापूस आंब्याची आवक कमी झाली होती. आता निवडणुका झाल्यामुळे रखडलेला माल मोठ्या प्रमाणात बाजात येऊ लागला आहे. त्यात सध्या प्रचंड वाढलेला उकाडा लक्षात घेता कोणत्याही क्षणी धो-धो पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आंब्याचे दर
कर्नाटक हापूस कच्चा (४ डझन)४०० ते ६००
कर्नाटक हापूस तयार (४ डझन) ७०० ते ९००
रत्नागिरी हापूस कच्चा (४ ते ८ डझन) ७०० ते १२००
रत्नागिरी हापूस (४ ते ८ डझन) ८०० ते १५००
केशर (गुजरात) २५ ते ४५ रुपये किलो
लालबाग १५ ते २५ रुपये किलो

Web Title:  Mango Market Rises From Karnataka Hapus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.