रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक हब व्हावे : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:49 PM2020-01-08T17:49:59+5:302020-01-08T17:53:47+5:30

रत्नागिरी जिल्हा पुण्यासारखा शैक्षणिक हब करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. नाबार्डअंतर्गत अंदाजे १ कोटी ३० लाख रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बु. सोमेश्वर तोणदे चिंचखरी येथील चिंचखरी दत्तमंदिर जवळील पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

Ratnagiri should become a district educational hub: Uday Samant | रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक हब व्हावे : उदय सामंत

रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक हब व्हावे : उदय सामंत

Next
ठळक मुद्देनाबार्डअंतर्गत अंदाजे १ कोटी ३० लाख रूपये खर्च करून पुलाचे कामजिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पुण्यासारखा शैक्षणिक हब करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. नाबार्डअंतर्गत अंदाजे १ कोटी ३० लाख रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बु. सोमेश्वर तोणदे चिंचखरी येथील चिंचखरी दत्तमंदिर जवळील पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, रत्नागिरी पंचायत समिती सभापती प्राजक्ता पाटील, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, सहाय्यक अभियंता वीना पुजारी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, राजेंद्र महाडिक, प्रमोद शेरे व चिंचखरी ग्रामस्थ उपस्थित होते.

उदय सामंत म्हणाले की, आपल्याला मिळालेल्या उच्च व तंत्रशिक्षण पदाचा वापर राज्याबरोबर जिल्ह्यातील विकासकामे करण्यासाठी करणार आहे. जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे पूर्णत्वास नेण्यास आपण प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.

जबाबदारीने काम करा

आता आपलं सरकार आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी टाकली आहे. आपण सर्वजण शासन आहोत, त्यामुळे आपण जबाबदारीने काम केली पाहिजेत. जास्तीत जास्त विकासकामे आपण केली पाहिजेत, असे उदय सामंत यांनी सांगितले. चिंचखरी येथे आगमन होताच उदय सामंत यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
 

Web Title: Ratnagiri should become a district educational hub: Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.