दापोली : पारंपरिक दागिने, हातात बांगड्या, नाकात नथ आणि ठसकेबाज नेसलेली नऊवारी साडी हा पेहराव केवळ महाराष्ट्रीयन महिलांचा असतो. हा नऊवारी साडीचा अस्सल मराठी साज उठून दिसत होता सातासमुद्रापार असलेल्या आबुधाबी देशात. मूळच्या दापोली येथील असणाऱ्या डॉ. पल्लवी बारटक्के - भांबुरे यांनी आपल्या मुलीसमवेत नऊवारी साडीत सहभाग घेऊन सर्वांनाच थक्क करून टाकले.आबुधाबी येथे झालेल्या अॅडनॉक पुरस्कृत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीची सुकन्या असलेली डॉ. पल्लवी प्रसाद बारटक्के - भांबुरे व त्यांची कन्या पावनी बारटके यांनी सहभाग घेतला होता. अस्सल मराठमोळी नऊवारी साडी नेसून त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि यशस्वीरीत्या स्पर्धा पूर्ण केली.आबुधाबी येथे असूनही आपल्यातील मराठी संस्कृतीमधील सगळे सण, समारंभ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वाचन, गायन असे कार्यक्रम घेण्यासाठी दापोलीची डॉ. पल्लवी भांबुरे नेहमीच अग्रेसर असतात.
रत्नागिरी : सातासमुद्रापार उठून दिसला नऊवारीचा साज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 13:22 IST
पारंपरिक दागिने, हातात बांगड्या, नाकात नथ आणि ठसकेबाज नेसलेली नऊवारी साडी हा पेहराव केवळ महाराष्ट्रीयन महिलांचा असतो. हा नऊवारी साडीचा अस्सल मराठी साज उठून दिसत होता सातासमुद्रापार असलेल्या आबुधाबी देशात. मूळच्या दापोली येथील असणाऱ्या डॉ. पल्लवी बारटक्के - भांबुरे यांनी आपल्या मुलीसमवेत नऊवारी साडीत सहभाग घेऊन सर्वांनाच थक्क करून टाकले.
रत्नागिरी : सातासमुद्रापार उठून दिसला नऊवारीचा साज
ठळक मुद्देसातासमुद्रापार उठून दिसला नऊवारीचा साजदापोलीची सुकन्या आबुधाबी येथे मॅरेथॉन स्पर्धेत