रत्नागिरीत महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 14:21 IST2017-10-10T14:14:10+5:302017-10-10T14:21:33+5:30
गेल्या तीन वर्षापासून महसूल कर्मचाºयांच्या मागण्यांची पुर्तता शासनाकडून झाली नसल्याने अखेर पुरवठा विभागाबरोबरच या कर्मचाºयांनी आता महसूल विभागाचे कामही आजपासून बंद केले आहे. जोपर्यंत या मागण्यांची पुर्तता होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा निर्धार संघटनेने केला आहे.

रत्नागिरी येथील महापुरूष मंदिरात बैठक झाली. यावेळी महसूल विभागाचे कामही बंद आंदोलन सुरू केले आहे.
रत्नागिरी,१० : गेल्या तीन वर्षापासून महसूल कर्मचाºयांच्या मागण्यांची पुर्तता शासनाकडून झाली नसल्याने अखेर पुरवठा विभागाबरोबरच या कर्मचाºयांनी आता महसूल विभागाचे कामही आजपासून बंद केले आहे. जोपर्यंत या मागण्यांची पुर्तता होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा निर्धार संघटनेने केला आहे.
२०१२ पासून महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. दरवर्षी हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. मात्र, शासनाने याकडे पुर्णत: दुर्लक्ष केलेले आहे. त्यातच पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदोन्नतीची पदे सरळसेवेतून थेट भरली जावीत तसेच पुरवठा विभागाची स्वतंत्र आस्थापना करावी, असा निर्णय शासनाने घेतला आहे.
या निर्णयामुळे महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर प्रत्यार्पित होऊन पदावनत व अतिरिक्त ठरतील. परिणामी बेकारीच्या संकटाला सामोरे जावे लागेल, या भीतीने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
याबाबत महसूलमंत्री यांच्याशी राज्य संघटनेने चर्चा करूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. महसूल विभागातील या निर्णयांना स्थगिती मिळावी, या मागणीसाठी गेल्या ३ आॅक्टोबरपासून महसूल कर्मचाऱ्यांनी राज्यभरच पुरवठा विभागाचे कामकाज बंद केले आहे.
या संपात जिल्ह्यात चतुर्थ श्रेणी ते पदोन्नत नायब तहसीलदार मिळून जिल्ह्यातील ४५० कर्मचारी सहभागी झाली आहेत. आज सकाळी येथील तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या महापुरूष मंदिरात रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघांची बैठक झाली.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. जोपर्यंत शासन दखल घेणार नाही, तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला