शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा दिवसा जोर, रात्री घोर; रत्नागिरीत आठ दिवसांत सर्वाधिक ५६६ मिमी. पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:38 IST

संगमेश्वर तालुक्यात सलग १३ दिवस संततधार पाऊस

रत्नागिरी : मे महिन्यात एवढे दिवस सलग पाऊस पडण्याचा आतापर्यंतचा हा उच्चांक जिल्ह्यात पहिलाच आहे. २० किंवा २१ मे पासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला असला तरी काही तालुक्यांमध्ये आतापर्यंत १२ ते १३ दिवस पाऊस पडत आहेत. गेल्या २७ दिवसांत जिल्ह्यात तब्बल ४६८ मिलीमीटर सरासरी पाऊस पडला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या १३ टक्के पाऊस आताच पडला आहे. आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे. दिवसा मुसळधार पडणाऱ्या पावसाचा रात्री वाऱ्यासह जोर अधिक वाढलेला असतो.जिल्ह्यात आतापर्यंत मे महिन्यात सलग पाऊस पहिल्यांदाच पडत आहे. जिल्ह्यात साधारणपणे ३३६४.२२ मिलीमीटर इतका पाऊस वार्षिक सरासरीने पडतो. मात्र, या मे महिन्यात जिल्ह्यात २७ मे पर्यंत (दुपारी २ वाजेपर्यंत) एकूण ४६२ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद जिल्ह्यातील ६५ मंडलामध्ये करण्यात आली आहे. म्हणजेच वार्षिक सरासरीच्या १३ टक्के पाऊस या २७ दिवसांच्या आत पडला आहे. अजूनही मान्सूनला प्रारंभ होण्यास काही दिवस आहेत. मात्र जून-जुलै महिन्यासारखा पाऊस गेल्या पाच-सहा दिवसांपासून पडत आहे.  सोमवारी दिवसा अधूनमधून थोडीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री जोर घेतला होता. मंगळवारी सकाळपासून सर्वच तालुक्यांमध्ये काही काळ उघडीप होती. मात्र, राजापूर, दापोली, गुहागर, रत्नागिरी आदी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर होता. मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६३.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. सध्या दिवसा पावसाची मुसळधार सुरू असली तरी अधूनमधून विश्रांती ही असते. रात्री मात्र,पाऊस संततधारेने पडत असतो. जिल्ह्यात ३१ मे पर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

कमी दिवसात अधिक पाऊस रत्नागिरीतरत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २७ दिवसांत संगमेश्वर तालुक्यात १३ दिवसांत ५०२.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मात्र, रत्नागिरी तालुक्यात आठ दिवसांतच सर्वाधिक ५६६.६ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

कुठल्या तालुक्यात किती दिवस?१ ते २७ मे या कालावधीत संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक १३ दिवस पाऊस पडला आहे. तर गुहागर, लांजा, राजापूर या तालुक्यांमध्ये १२ दिवस, चिपळूणमध्ये १९, खेडमध्ये ९, रत्नागिरी आणि दापोलीत ८, तर मंडणगड तालुक्यामध्ये ७ दिवस पाऊस पडला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस