शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सायकल मॅरेथॉनमधून धावले रत्नागिरीकर, पहिल्याच रॅलीत ४०० जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 13:14 IST

रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या विद्यमाने रत्नागिरीत पहिली सायकल मॅरेथॉन झाली. या सायकल मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी व १०० रत्नागिरीकर सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसायकल मॅरेथॉनमधून धावले रत्नागिरीकर पहिल्याच रॅलीत ४०० जणांचा समावेश

रत्नागिरी : रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या विद्यमाने रविवारी रत्नागिरीत पहिली सायकल मॅरेथॉन झाली. या सायकल मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी व १०० रत्नागिरीकर सहभागी झाले होते.

मॅरेथॉन स्पर्धेसाठी आयटीआय- शिवाजीनगर ते हातखंबा व परत शिवाजीनगर हा मार्ग निश्चित करण्यात आला होता. आरोग्यवर्धक आणि इंधनाची बचत करणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सायकल मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी, नागरिक उत्स्फूर्तरित्या सहभागी झाले होते.

अशाप्रकारचा उपक्रम दोन महिन्यातून एकदा तरी आयोजित करण्यात यावा, अशी अपेक्षा यावेळी नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होती. आयटीआय मार्गावरील मंगळवार आठवडा बाजार येथे या मॅरेथॉनचे उद्घाटन सकाळी ६ वाजता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी झेंडा दाखवला व शंभर नागरिकांनी हातखंब्याकडे कूच केली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ३०० विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉनचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याहस्ते करण्यात आले. रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य धरमसी चौहान यांनी या मॅरेथॉनला झेंडा दाखवला.शिवाजीनगर ते हातखंबा या मॅरेथॉन मार्गावर रिकामा टेम्पो, वैद्यकीय व्यवस्था, रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. याशिवाय मार्गावर एनर्जी ड्रिंक, पाणी देण्याची व्यवस्था दहा ठिकाणी करण्यात आली होती. त्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सायकलस्वारांसाठी साळवी स्टॉप येथील चिरायू हॉस्पिटल शेजारील स्टॉलवर पाणी, बिस्कीटे व एनर्जी ड्रिंकची सुविधा करण्यात आली होती.सायकल ट्रॅक उभारारत्नागिरी शहरात दुचाकी, चारचाकी व रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रस्त्याने जाताना सायकलस्वारांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. याकरिता शहरातील रस्त्यांवर स्वतंत्र सायकल ट्रॅक उभारावा, अशी विनंती वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्याला सहमती दर्शवत नव्या रस्त्यांवर अशी सुविधा देण्याचा मानस असल्याचे सांगितले.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनRatnagiriरत्नागिरी