शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाविरोधात राज ठाकरेंची उडी, शनिवारी घेणार ग्रामस्थांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 16:35 IST

रिफायनरी प्रकल्पावरुन विरोधाची लाट निर्माण झाली असतानाच अद्यापपर्यंत या प्रकल्पाबाबत कोणतीच भूमिका जाहीर न करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी प्रकल्पस्थळाला भेट देऊन तेथील जनतेशी संवाद साधणार आहेत.

ठळक मुद्देशनिवारी मनसे अध्यक्ष प्रकल्पस्थळाला भेट देणार, प्रकल्प परिसराचा करणार दौराप्रखर विरोध करणाऱ्या जनतेशी संवाद साधणार राज ठाकरे यांच्याशी मुंबईत भेट घेऊन ग्रामस्थांनी केली होती चर्चा

राजापूर : रिफायनरी प्रकल्पावरुन विरोधाची लाट निर्माण झाली असतानाच अद्यापपर्यंत या प्रकल्पाबाबत कोणतीच भूमिका जाहीर न करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी प्रकल्पस्थळाला भेट देऊन तेथील जनतेशी संवाद साधणार आहेत. आजवर विकासालाच प्राधान्य देणारे मनसे अध्यक्ष यावेळी रिफायनरीबाबत कोणती भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रकल्प परिसराचा दौरा करणार आहेत. यावेळी प्रखर विरोध करणाऱ्या जनतेशी संवाद साधणार आहेत. केंद्र व राज्याची भागिदारी असलेला रिफायनरी प्रकल्प कोकणवासियांच्या माथी मारण्यात आला आहे. त्याला स्थानिक जनतेचा मोठा विरोध आहे.

ग्रामस्थांच्या विरोधानंतर शिवसेना, दोन्ही काँग्रेससह नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील प्रकल्पाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. या प्रकल्पाबाबत मनसेने अद्याप आपली कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी सागवे - नाणार परिसराचा दौरा केला होता.

या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाला नक्की विरोध कशासाठी आहे, याची माहिती घेतली होती. मनसेने विकासाला प्राधान्य दिले असले एखादा प्रकल्प शासन लादत असेल तर त्याला विरोध असेल असे मनसेच्या नेत्याने त्यावेळी सांगितले होते.या प्रकल्पाबाबत काही ग्रामस्थांनी राज ठाकरे यांच्याशी मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली होती. या चर्चेदरम्याने त्यांनी ग्रामस्थांची भूमिका समजून घेत आपण प्रकल्प परिसराचा दौरा करूनच याबाबत आपली भूमिका मांडू असे सांगितले होते. त्यानुसार शनिवारी ते नाणार परिसराला भेट देणार आहेत. यावेळी ते नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करतात याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRatnagiriरत्नागिरीMNSमनसे