शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

रत्नागिरी : पु. लं.चा दानयज्ञ जगभर पोहोचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 15:33 IST

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुल व सुनीताबाई यांनी सुरू केलेल्या दान यज्ञाला जगभरात पोहोचविण्यासाठी येथील आर्ट सर्कल संस्थेने पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावर #पुलसुनीत फेसबुक पेज तयार केले आहे.

ठळक मुद्देपु. लं.चा दानयज्ञ जगभर पोहोचणारसोशल मीडियावर पुलसुनीत फेसबुक पेज

रत्नागिरी : पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुल व सुनीताबाई यांनी सुरू केलेल्या दान यज्ञाला जगभरात पोहोचविण्यासाठी येथील आर्ट सर्कल संस्थेने पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावर #पुलसुनीत फेसबुक पेज तयार केले आहे.

पु. ल.प्रेमींनी जगाच्या पाठीवर कुठेही असताना तेथील गरजू संस्थेला पुल आणि सुनीताबाई यांच्या नावाने मदत करावी व फेसबुक पेजवर कळविण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. आर्ट सर्कलतर्फे नितीन कानविंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना फेसबुक पेजबाबत माहिती दिली.एखादी संकल्पना जगभरात पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा उत्तम वापर करता येतो, हे आता सिध्द झाले आहे. यासाठी सोशल मीडियावर (#) हॅशटॅग चळवळ पुलंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चालवण्याचे ठरविले आहे. गेली दहा वर्षे रत्नागिरीमध्ये पुलोत्सवच्या माध्यमातून संस्थेतर्फे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात येत आहे. पुल आणि सुनीताबाई यांनी शेकडो संस्थांना उभे राहण्यासाठी मदत केली. त्यामध्ये मुक्तांगण, आयुकासारख्या संस्थाचा समावेश आहे.हे दानयज्ञ चालवताना दोघांनीही त्याबाबत वाच्यता केलेली नव्हती. मात्र, पुल साहित्यिक, लेखक, अभिनेते, संगीतकार, कथाकार होते तसेच ते दानशूर होते. याची माहिती जगभर पोहोचावी आणि त्याच प्रेरणेतून जगभरातील गरजू संस्थांपर्यंत मदतीचे हात पोहोचविण्याच्या उद्देशातून फेसबुक पेज सुरू केले आहे. या सोशल मीडियावरील चळवळीसाठी आतापर्यंत जे सेलिब्रिटी पुलोत्सवच्या माध्यमातून रत्नागिरीत येऊन गेले त्यांनाही यामध्ये सहभागी करून घेणार आहे.

टॅग्स :P L Deshpandeपु. ल. देशपांडेRatnagiriरत्नागिरीSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक