शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

रत्नागिरी : मद्यवाहतुकीवर उत्पादन शुल्कची नजर,  जिल्ह्यात नववर्ष स्वागताची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 15:50 IST

मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात बेकायदा दारूची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागातर्फे महामार्गावर तपासणी मोहीम कडक करण्यात आली आहे. महामार्गावर दोन तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. बेकायदा मद्याचा महापूर रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक वाहनांची तपासणी करीत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात नववर्ष स्वागताची तयारी कुंभार्ली, खारेपाटणजवळ वाहन तपासणी नाकेदारूभट्ट्यांचे आव्हान, परमीट रुमचीही झडती

रत्नागिरी : मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात बेकायदा दारूची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागातर्फे महामार्गावर तपासणी मोहीम कडक करण्यात आली आहे. महामार्गावर दोन तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. बेकायदा मद्याचा महापूर रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक वाहनांची तपासणी करीत आहे.गेल्या काही वर्षांपासून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावरून केली जात आहे. चोरी-छुपे हे गोवा बनावटीचे विदेशी मद्य महामार्गावरून विविध क्लुप्त्या लढवून नेले जात आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात महामार्गावरून चोरट्या पध्दतीने वाहतूक होत असलेले विदेशी मद्य तसेच स्पिरीट उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले होते. याप्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.३१ डिसेंबरला अवघे काही दिवस उरलेले असताना गोवा बनावटीच्या मद्याची चोरटी वाहतूक जोरात सुरू झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यात बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक होऊ नये, होत असल्यास असे मद्य जप्त करावे, संबंधितांवर कारवाई करावी, यासाठी उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या सीमेवर दोन ठिकाणी तपासणी नाकी उभारली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर राजापूर तालुक्यात महामार्गावर एक तपासणी नाके उभारण्यात आले आहे, तर दुसरे तपासणी नाके कुंभार्ली घाटात उभारण्यात आले आहे. उत्पादन शुल्कचे एक जिल्हा भरारी पथकही कार्यरत झाले आहे. रेल्वेच्या रो-रो सेवेमार्फतही काही महिन्यांपूर्वी गोवा बनावटीच्या बेकायदा मद्याची, स्पिरीटची वाहतूक झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे रेल्वेदवारे मद्य वाहतूक होणार नाही, याकडेही लक्ष दिले जात आहे.दारूभट्ट्यांचे आव्हानमहामार्गावरून बेकायदा वाहतूक होणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक रोखणे, हे उत्पादन शुल्क विभागासमोरील आव्हान आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गावठी दारूच्या भट्ट्यांमधून निर्माण झालेली दारू पकडण्याचे, भट्ट्या उद्ध्वस्त करण्याचेही आव्हान उत्पादन शुल्क विभागासमोर आहे. गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करूनही त्या पुन्हा उभारल्या जाणाºया ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे.परमीट रुमचीही झडतीजिल्ह्यातील परमीट रूमवरही उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बारमध्ये गोवा बनावटीचे बेकायदा मद्य तर नाहीना, याचीही तपासणी विभागाच्या पथकामार्फत केली जात आहे. बेकायदा मद्यसाठा अन्यत्र कोठे करण्यात आला आहे काय, याचीही माहिती विभागामार्फत घेतली जात आहे. लांजा विभागात परमीट रूमच्या झालेल्या झाडाझडतीमध्ये अद्याप तरी काही गैर आढळून आलेले नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस