शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पाेलिस शिपाई भरतीसाठी २ एप्रिलला लेखी परीक्षा

By अरुण आडिवरेकर | Updated: March 31, 2023 14:01 IST

रत्नागिरी : सन २०२१ मधील जिल्हा पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक २ एप्रिल ...

रत्नागिरी : सन २०२१ मधील जिल्हा पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक २ एप्रिल २०२३ राेजी सकाळी ८:३० वाजता रत्नागिरी शहरातील विविध शाळा / महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ६,९१३ इतके उमेदवार पात्र ठरले आहेत.या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी https://policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करण्यास दिनांक २९/०३/२०२३ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्राच्या प्रतिसह दिनांक २ राेजी सकाळी ६ वाजता उपस्थित राहावे. ही परीक्षा रत्नागिरी शहरातील मिस्त्री हायस्कूल, गाेगटे - जाेगळेकर महाविद्यालय, श्रीमान भागाेजी शेठ कीर लाॅ काॅलेज, श्रीमान गंगाधर गाेविंद पटवर्धन इंग्लिश स्कूल (जीजीपीएस) आणि रा. भा. शिर्के प्रशाला येथे हाेणार आहे.लेखी परीक्षेबाबतच्या सविस्तर सूचना रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे www.ratnagiripolice.co.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांना काही अडचण / समस्या असल्यास त्यांनी पोलिस नियंत्रण कक्ष रत्नागिरी ०२३५२-२७१२५७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसexamपरीक्षा