शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पंचायत समिती सभेत गटविकास अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 17:45 IST

सभापतींनी लेखी दिलेले नसल्याने ग्रामसेवक सभेला उपस्थित नसल्याचे उत्तर दिल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी गटविकास अधिकारी व्ही. व्ही. जमदाडे यांना चांगलेच फैलावर घेतले. त्याचबरोबर गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला पाठीशी घातल्याच्या निषेधार्थ सर्वच सदस्यांनी सभात्याग केल्याने सभापती मेघना पाष्टे यांनी ही सभा स्थगित केली.

ठळक मुद्देरत्नागिरी पंचायत समिती सभेत गटविकास अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सभात्याग ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्याचा सदस्यांचा आरोप

रत्नागिरी : सभापतींनी लेखी दिलेले नसल्याने ग्रामसेवक सभेला उपस्थित नसल्याचे उत्तर दिल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी गटविकास अधिकारी व्ही. व्ही. जमदाडे यांना चांगलेच फैलावर घेतले.

गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला पाठीशी घातल्याच्या निषेधार्थ सर्वच सदस्यांनी सभात्याग केल्याने सभापती मेघना पाष्टे यांनी ही सभा स्थगित केली.

आचारसंहितेच्या कालावधीत कामे करणाऱ्या कोतवडे ग्रामपंचायतीची तसेच सुरुची जिवंत झाडे तोडण्याचे आदेश देणाऱ्या वनखात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली.तालुक्यातील मौजे कोतवडे, ढोकमळे येथील सुरुच्या झाडांची ठेकेदाराकडून कत्तल केली जात असल्याचे सदस्य गजानन पाटील यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरुच्या ५५१ झाडांचे मूल्यांकन केवळ ८४ हजार रुपये केले.

यावेळी तोडण्यात आलेले एकही झाड सुके नसून, १५६ सुरुची जिवंत झाडे तोडण्यात आली आहेत. वनखात्याचे अधिकारी परजिल्ह्यातील ठेकेदाराला हाताशी धरुन काम करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

या झाडांच्या मूल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी गजानन पाटील व इतर सदस्यांनी केली. त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबतची चौकशी सुरु असून, ती लवकरच पूर्ण करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.आचारसंहितेच्या कालावधीत कोतवडे ग्रामपंचायतीने रस्त्यांची ४ कामे करुन लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. ही कामे आचारसंहितेच्या कालावधीत करुन संबंधितांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. याबाबत सभापतींनी गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.सभापतींनी सूचना देऊन ग्रामसेवक आजच्या सभेला उपस्थित राहिले नाहीत. त्याबद्दल सदस्य पाटील यांनी ग्रामसेवक या सभेला उपस्थित का राहिले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर गटविकास अधिकारी जमदाडे यांनी ग्रामसेवकाला लेखी दिले नसल्याने ते नियमानुसार उपस्थित राहू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

त्यावर संतप्त झालेले गजानन पाटील, उत्तम सावंत यांनी व अन्य सदस्यांनी संताप व्यक्त केला. त्यावेळी सदस्य पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांना आपण आतापर्यंत ग्रामसेवकांना अन्य ग्रामपंचायतींचा चार्ज देण्याचे काम नियमात केलेत का? त्याबाबतचा नियम सांगा, असा प्रतिप्रश्न केल्याने गटविकास अधिकारी गोंधळून गेले. त्यांना दोन ग्रामपंचायतीतील नियमच माहिती नसल्याने त्यांनी थातूरमातूर उत्तर दिले. त्यावेळी सदस्यांनी आक्रमक होऊन गटविकास अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

काहीवेळाने सदस्य सावंत यांनी पुन्हा ह्यत्याह्ण ग्रामसेवकाला सभागृहात बोलावलेत का, अशी विचारणा केली असता गटविकास अधिकाऱ्यांनी नाही म्हटले. त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सभात्याग केला. त्यानंतर सभापतींनी ही सभा तहकूब केली.गटविकास अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्तआजच्या रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत सदस्य तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असतानाच गटविकास अधिकारी जमदाडे हे मोबाईलमध्ये मग्न असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना तालुक्यातील समस्यांपेक्षा मोबाईलमध्ये जास्त रस असल्याची कुजबूज सभागृहात सुुरु होती.सदस्य आक्रमकरत्नागिरी तालुक्यातील कोतवडे ग्रामपंचायतीच्या प्रश्नावरूनच आजची सभा वादळी ठरली. कोतवडे भागातील सुरुच्या बनांची केली जाणारी कत्तल आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पंचायत समिती सदस्य आक्रमक झाले होेते.

हा मुद्दा चर्चिला जात असतानाच दुसरीकडे आचारसंहितेच्या काळात रस्त्याची कामे झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांनाही धारेवर धरण्यात आले. ग्रामसेवकांनी सभेकडे पाठ फिरवल्याने सदस्य आणखीनच आक्रमक झाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीpanchayat samitiपंचायत समिती