शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

रत्नागिरी : यापुढे हाफकीनकडून औषधे न घेण्याचा निर्णय : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:56 IST

हाफकीन संस्थेकडून औषध पुरवठ्यास विलंब होत असल्याने यापुढे हाफकीनकडून औषधे न घेता जिल्हा नियोजन मंडळांनी स्वखर्चाने ही औषधे जिल्हा रुग्णालयांना उपलब्ध करून द्यावीत, असा निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देयापुढे हाफकीनकडून औषधे न घेण्याचा निर्णय : उदय सामंत रुग्णालयांना नियोजन मंडळेच पुरवणार औषधे

रत्नागिरी : हाफकीन संस्थेकडून औषध पुरवठ्यास विलंब होत असल्याने यापुढे हाफकीनकडून औषधे न घेता जिल्हा नियोजन मंडळांनी स्वखर्चाने ही औषधे जिल्हा रुग्णालयांना उपलब्ध करून द्यावीत, असा निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी घेतला आहे.

रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सकांनी आपल्याकडे केलेल्या तक्रारीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा लाभ राज्यातील सर्वच जिल्हा रुग्णालयांना होणार आहे. राज्यातील जिल्हा रुग्णालयांसाठी दरवर्षी लागणारी सुमारे २५० कोटींची औषध खरेदी आता हाफकीनऐवजी अन्य ठिकाणांहून केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र  गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिली.मागणी करूनही रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला हाफकीनकडून औषधांचा पुरवठा वेळेत होत नसल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक प्रल्हाद देवकर यांनी आपल्याकडे केली होती. त्यांची ही तक्रार आपण राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे मांडली.

 औषध पुरवठ्याचे कंत्राट हाफकीनकडे आहे. परंतु आता राज्यातील सर्वच जिल्हा नियोजन मंडळांना स्वखर्चाने थेटपणे ही औषधे तेथील जिल्हा रुग्णालयांना उपलब्ध करून देता येणार आहेत. याबाबत १ आॅगस्टच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शासन आदेश काढण्यात आला आहे, असे सामंत म्हणाले.६० वर्षीय ज्येष्ठांना एस. टी. पासवयाची साठ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एस. टी. प्रवासासाठी सवलतीचा पास मिळावा, असा निर्णय सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. याबाबत रत्नागिरीतील ज्येष्ठ नागरिकांच्या दोन महिन्यांपूर्वीच्या बैठकीत आपण हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. आता ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना सवलत पास देण्याचा आदेश एस. टी.च्या प्रत्येक विभागाला शासनाकडून पाठविण्यात आला असून, याची अंमलबजावणी सुरू होणार आहे, असे सामंत म्हणाले.आमदार सामंत म्हणाले..रत्नागिरी रेल्वे स्थानकातून दररोज पहाटे ४ वाजता मुंबईसाठी गाडी असावी. ही गाडी मुंबईत सकाळी १० वाजेपर्यंत पोहोचेल व चार-पाच तासांचे काम आटोपून रत्नागिरीकरांना पुन्हा रात्रीपर्यंत रत्नागिरीत परतता येईल. ही मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली जाणार आहे.साडेचार लाख रुपयांमध्ये ५६० चौरसफुटांचे घर उपलब्ध करणारे प्री-कास्ट तंत्रज्ञान चेन्नईत विकसित झाले आहे. त्याचा अभ्यास दौरा म्हाडाकडून सध्या सुरू आहे. या तंत्रज्ञानाद्वारे ५० मजली इमारत उभारणे शक्य होणार आहे.म्हाडाचे परदेश दौरे व अभ्यास दौरे यापुढे केवळ तांत्रिक अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच असतील. राजकीय नेत्यांना दूर ठेवले जाईल.राज्यात म्हाडाकडून लॉटरीअंतर्गत २० लाखांमध्ये दिली जाणारी घरे १० लाखात देण्याचा प्रयत्न करणार. डोंबिवलीतील म्हाडाची घरे तयार असूनही लॉटरी लागलेल्या व १० टक्के रक्कम भरलेल्यांना ही घरे दाखविली जात नसल्याची तक्रार आल्यानंतर आता संबंधित बिल्डर मंगल प्रभात लोढा यांना संबंधितांच्या ताब्यात ही घरे देण्याची नोटीस बजावली आहे, असे उदय सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :medicinesऔषधंRatnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत