शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, सोडले नैसर्गिक अधिवासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:35 IST

संगमेश्वर तालुक्याच्या विविध भागात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असताना गुरूवारी सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत कोसळल्याची घटना वायंगणे - नवेलेवाडी येथे घडली. ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात यश मिळवले. सायंकाळी या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

ठळक मुद्देसंगमेश्वर तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदानबिबट्याला सोडले नैसर्गिक अधिवासात

देवरूख : संगमेश्वर तालुक्याच्या विविध भागात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असताना सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत कोसळल्याची घटना वायंगणे - नवेलेवाडी येथे घडली. ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात यश मिळवले. सायंकाळी या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.वायंगणे नवेलेवाडी येथे गुरूवारी रात्री सावजाचा पाठ करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. येथील ग्रामस्थ विठ्ठल बाळू नवेले हे शुक्रवारी सकाळी पाणी भरण्यासाठी गेले असता, विहिरीत बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. ही बाब गावात पसरताच ग्रामस्थांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली.सरपंच सुरेश घडशी यांनी ही माहिती वन विभागाला दिली.

वन विभागाचे वनरक्षक एल. बी. गुरव, सागर गोसावी, डी. आर. कोळेकर, डी. व्ही. आरेकर, एन. एस. गावडे, विक्रम कुंभार, राहुल गुंठे हे पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.दोन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात यश आले. बिबट्याला वर काढताच त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. फिरते पथक चिपळूणचे वनक्षेत्रपाल शहाजी पाटील, निलख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बिबट्या सुमारे २ वर्षे वयाचा होता. शुक्रवारी सायंकाळी या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTigerवाघ