कोनांबे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:59 PM2018-02-21T23:59:10+5:302018-02-22T00:18:05+5:30

तालुक्यातील कोनांबे येथे मध्यरात्री विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे वनविभागाने सुमारे दोन तास मोहीम राबवून बिबट्याला बाहेर काढले. विहिरीबाहेर येताच बिबट्याने धूम ठोकली.

Livelihood of leopard lying on the well in Conambay | कोनांबे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

कोनांबे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

Next
ठळक मुद्दे रात्रीच्यावेळी कुत्रा मोठ्याने भुंकत असल्याने संशय आला. विहिरीत काहीतरी पडल्याने धप्प असा आवाज झालारात्रीच्यावेळी नागरिकांची खूपच गर्दी झाली

सिन्नर : तालुक्यातील कोनांबे येथे मध्यरात्री विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे वनविभागाने सुमारे दोन तास मोहीम राबवून बिबट्याला बाहेर काढले. विहिरीबाहेर येताच बिबट्याने धूम ठोकली. कोनांबे शिवारात रात्रीच्यावेळी कुत्रा मोठ्याने भुंकत असल्याने सुरेश निवृत्ती पांचवे यांना संशय आला. याचवेळी विहिरीत काहीतरी पडल्याने धप्प असा आवाज झाला. पांचवे यांनी बॅटरीच्या उजेडात पाहताच बिबट्या कठड्याला धरून असल्याचे निदर्शनास आले. विहिरीत २५ फूट पाणी होते. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.  सुरेश पांचवे यांनी सरपंच संजय डावरे, सदस्य प्रकाश डावरे,  ज्ञानदेव भांगरे यांना बोलावून घेतले. वनकर्मचारी लोंढे यांना
याबाबत माहिती दिली. बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती गाव परिसरात पसरल्याने त्यास पाहण्यासाठी रात्रीच्यावेळी नागरिकांची खूपच गर्दी झाली होती. उपस्थितांच्या मोबाइल बॅटरीच्या उजेडाने बिबट्या डरकाळ्या फोडत होता. अरुण पांचवे, प्रमोद पांचवे आदींनी दोराच्या साहाय्याने विहिरीत लाकडी बाज सोडली.  दिवसा बचाव मोहीम राबविण्यास गर्दीमुळे अडथळा  येऊ शकतो. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाºयांनी मध्यरात्री  तीनच्या सुमारास बाजेच्या साहाय्याने बिबट्याला विहिरीबाहेर  काढले. विहिरीच्या कठड्याजवळ येताच बिबट्याने बाजेवरून विहिरीबाहेर जोरदार उडी मारत धूम ठोकली.

Web Title: Livelihood of leopard lying on the well in Conambay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.