शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : दारुबंदीतून जमलेल्या पैशातून उभारली नळपाणी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:25 IST

चिपळूण तालुक्यातील खेरशेत - बेंडलवाडीतील ग्रामस्थांनी ३५ वर्षांपूर्वी दारुबंदी करून जमा झालेल्या रकमेतून ३५ लाख रुपयांमधून नळपाणी योजना राबवली. त्यामुळे वाडीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. हे काम वाखाणण्याजोगे असून, त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.

ठळक मुद्दे- ३५ लाखांच्या योजनेसाठी ३५ वर्षांची मेहनत- खेरशेत बेंडलवाडी ग्रामस्थांचे लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारे कार्य

आरवली : चिपळूण तालुक्यातील खेरशेत - बेंडलवाडीतील ग्रामस्थांनी ३५ वर्षांपूर्वी दारुबंदी करून जमा झालेल्या रकमेतून ३५ लाख रुपयांमधून नळपाणी योजना राबवली. त्यामुळे वाडीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. हे काम वाखाणण्याजोगे असून, त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.लोकांना पाणी देणे, हे राज्यकर्त्यांचे काम असते, जे सत्तेत असतात ते नेहमी पाणी, रस्ते आणि वीज या विषयावर राजकारण करत आम्ही करुन दाखवल्याचा बावटा मिरवत असतात. जिल्ह्यात विविध ठिकाणी नळपाणी योजनांवर करोडो रुपये खर्च होत आहेत. तरीही जिल्हा टंचाईमुक्त होऊ शकला नाही. मात्र, खेरशेत - बेंडलवाडी ग्रामस्थांनी स्वत: पुढाकार घेत एक गाव टंचाईमुक्त केले आहे.

खेरशेतमधील सार्वजनिक विहिरीचे पाणी भरताना सन २०१४मध्ये पाच महिला विहिरीत कोसळल्या होत्या. त्यापैकी चारजणींना वाचवण्यात यश आले. मात्र, त्यावेळी दर्शना आग्रे या ३३ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी घटलेल्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला होता.लोकप्रतिनिधी, अधिकारी घटनास्थळी धावून आले. विहीर बांधण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र दिलेले आश्वासन हवेत विरले. विहीर अथवा नळपाणी योजना झालीच नाही; अखेर येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बेंडलवाडीतील ग्रामस्थांना पुढाकार घ्यावा लागला.

सोमा बेंडल, चंद्र्रकांत बेंडल, रघुनाथ बेंडल, भार्गव फेपडे, नारायण आग्रे आदी कार्यकर्त्यांनी योजना राबवण्यासाठी मेहनत घेतली. बेंडलवाडीतील ३५ कुटुंबानी मिळून ३५ लाखाची रक्कम उभी केली. वर्गणी व श्रमदानातून ३५ कुटुंबानी मिळून ३५ लाखाची योजना उभारणे, हे कार्य कौतुकास्पद असून, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

खेरशेत - बेंडलवाडी ग्रामस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली तरीही आमचे हात छोटे पडतील, असे गौरवोद्गार उद्घाटनप्रसंगी सुरेश भायजे यांनी काढले. नळपाणी योजना उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या पूनम चव्हाण, माजी उपसभापती संतोष चव्हाण, चंद्र्रकांत जाधव, सरपंच संतोष मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी