शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : प्रत्येक तालुक्यात आंबा महोत्सव,  कृषी उत्पन्न बाजार समिती,  पणन मंडळानेही घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:03 IST

रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रत्येक तालुक्यात महामार्गालगत आंबा विक्रीसाठी शेड उभारून तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आंबा महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळानेदेखील त्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे.

ठळक मुद्दे- आंबा, काजूप्रमाणे आता सुपारीचाही समावेश पीक कर्जामध्ये होणार- शासनाने सुपारी पीक कर्जाला मान्यता दिली असून, लवकरच अधिकृत घोषणाही होणार आहे.- शेतकरी ते ग्राहक थेट आंबा विक्रीसाठी प्रयत्न.- मंडणगड, दापोली, खेड, सावर्डे, लांजा, रत्नागिरी येथे आंबा विक्रीसाठी स्टॉल उभारणार.

रत्नागिरी : रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रत्येक तालुक्यात महामार्गालगत आंबा विक्रीसाठी शेड उभारून तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आंबा महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळानेदेखील त्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या आंब्याची विक्री शेतकऱ्याला स्वत:च करता येणार आहे. यापुढे उत्पादक ते ग्राहक अशी संकल्पना राबविण्याचा बाजार समितीचा संकल्प आहे.रत्नागिरी हापूसला ग्राहकांकडून चांगली मागणी होत असतानाच त्याच दरम्यान कर्नाटकचा हापूस आंबा बाजारात येतो. व्यापारीवर्ग मात्र ग्राहकांची दिशाभूल करून रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करतो.

कमी किंमतीत कर्नाटक हापूस खरेदी करून तो चढ्या दराने रत्नागिरी हापूस म्हणून विक्री केला जातो. यामध्ये व्यापाऱ्यांचा फायदा होतो व गरीब शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होते. हे टाळण्यासाठी बाजार समितीने तालुकापातळीवर आंबा महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी, सचिव किरण महाजन, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, सहाय्यक उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी हे जिल्हाभर दौरा करून शेतकऱ्यांना याबाबत माहिती देत आहेत.

बाजार समितीच्या आवारात आंबा लिलाव शेड बांधण्यात आली असून, यावर्षी आंबा पिकाच्या हंगामात परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे माल विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांकडील आंब्याच्या थेट खरेदीसाठी मुंबई, पुणे येथील व्यापाऱ्यांना रत्नागिरीत बोलावण्यात येणार असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला स्वत: दर ठरवून विक्री करण्याची संधी प्राप्त होणार आहे.काजू पीक तारणशेतकऱ्यांना काजू बीसाठी ७५ टक्के किंवा ८० रूपये किलोप्रमाणे ६ टक्के व्याजाने पीक तारण कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज शेतकऱ्यांनी १८० दिवसात फेडावयाचे आहे.

विविध कार्यकारी सोसायटी किंवा बाजार समितीने नियोजन केलेल्या गोडावूनमध्ये काजू पीक तारण म्हणून ठेवायचे आहे. चांगला दर काजूला मिळाल्यावर त्याची विक्री करू न हे कर्ज फेडता येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagricultureशेती