शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : लाल रंगाची उधळण करत संगमेश्वरवासिय रंगात न्हाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:46 IST

संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी लाल रंगाची उधळण व काजूगर घातलेल्या मटणासोबत भाकरीचा प्रसाद देऊन साजरा केला. या शिंपण्याची सांगता सायंकाळी फेऱ्याने करण्यात आली. या उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी होऊन लाल रंगात न्हाऊन निघाले होते.

ठळक मुद्देशिंपणे उत्सवाच्या दिवशीही नवस फेडण्याचा कार्यक्रमलेंडी फोडण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे आनंदात

देवरूख : संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी लाल रंगाची उधळण व भाकरीचा प्रसाद देऊन साजरा केला. या शिंपण्याची सांगता सायंकाळी फेऱ्याने करण्यात आली. या उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी होऊन लाल रंगात न्हाऊन निघाले होते.दुपारपासून गणपती मंदिर येथून फेऱ्याला सुरूवात झाली. फेऱ्यामध्ये बैलगाड्यांमधून रंगांची उधळण करण्यात आली. या उत्सवात वापरण्यात येणारा रंग लाल असतो. लाल रंगाची उधळण हेच कसबा येथील रंगपंचमीचे खास वैशिष्ट्य असून, हा लाल रंग विजयाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे.

या उत्सवावेळी जाखमातेचा जयजयकार करत लाल रंग एकमेकांवर उडवत शिंपणे साजरे करण्यात आले. या उत्सवाप्रसंगी नवसाचे बलिदान दिले जाते. यानुसार शिंपणे उत्सवाच्या दिवशीही नवस फेडण्याचा कार्यक्रम पार पडला.मुंबई - गोवा महामार्गालगतच हा उत्सव पार पडला. भाविकाला भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी जाखमातेच्या दर्शनाचा लाभ संगमेश्वरच्या माहेरवाशिणी पतीसोबत घेतानाचे चित्र पाहावयास मिळाले. या उत्सवासाठी नवविवाहीत महिला पतीसह खास आदल्या दिवशी कसबा संगमेश्वर येथे देवी जाखमातेचे दर्शन घेऊन देवीला फळे वाहतात.

घरातील लहान मुलांनी जावयाला रंगवण्याची पध्दत संगमेश्वरमध्ये अनेक वर्षे सुरू आहे. ही प्रथा आजही पहायला मिळते. या उत्सवामध्ये केवळ पुरूषच नव्हे; तर स्त्रियादेखील तेवढ्याच उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. कसबा येथील या मंदिराच्या शेजारी रंगांची तळी उभारली जातात. ही तळी या उत्सवाच्या दिवशी फोडतात, याला लेंडी फोडणे असे म्हणतात.याप्रमाणे लेंडी फोडण्याचा कार्यक्रम शुक्रवारी प्रतिवर्षाप्रमाणे आनंदात पार पडला. संगमेश्वर शहराला सायंकाळी फेरा मारून जाखमातेच्या मंदिराजवळ या उत्सवाची सांगता करण्यात आली. मुंबई - गोवा महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला याहीवर्षी भाकरीचा प्रसाद वाटप करण्यात आला. दरम्यान या उत्सवावेळी संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.प्रसादाचा आस्वादसंगमेश्वर तालुक्यातील जाखमातेचा शिंपणे उत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. उत्सवाची महती दरवर्षी वाढतच असल्याचे दिसत आहे. या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे या उत्सवादरम्यान काजूयुक्त - वडे आणि भाकरी असा प्रसाद दिला जातो. हा प्रसाद घेण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शेकडो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेऊन लाल रंगाच्या उधळणीमध्ये स्वत:ला रंगवून घेतले होते. या शिंपणे उत्सवामुळे संपूर्ण रस्ताच लाल रंगाने न्हाऊन गेला होता. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTempleमंदिर