रत्नागिरी : पाच वर्षानंतर कमी पाऊस
By Admin | Updated: October 6, 2014 22:33 IST2014-10-06T21:44:13+5:302014-10-06T22:33:37+5:30
दहा वर्षात दुसऱ्यांदा पावसाने रडवले

रत्नागिरी : पाच वर्षानंतर कमी पाऊस
रत्नागिरी : गेल्या दहा वर्षात यावर्षी दुसऱ्यांदा शासकीय प्रमाणकापेक्षा सरासरी पाऊस कमी पडला आहे. २००९ साली यंदापेक्षाही पाऊस कमी झाला होता. पुन्हा पाच वर्षांनंतर कमी पाऊस झाला आहे.
शासकीय प्रमाणकानुसार रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी ३३६४ मिलिमीटर इतका पाऊस होतो. मात्र, २००९ साली या चार महिन्यात झालेला पाऊस सरासरी २८६७ मिलिमीटर इतका नोंदला गेला आहे. म्हणजे या प्रमाणकापेक्षा ५२७ मिलिमीटर इतका कमी झाला होता.
तसेच यावर्षीही ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी ३०१५ मिलिमीटर म्हणजे ३५० मिलिमीटरने कमी झाला आहे. सन २००९च्या आॅगस्ट महिन्यापर्यंत पडलेला पाऊस सर्वात कमी (२२८२ मिलिमीटर) तसेच यावर्षीही आॅगस्ट २०१४ पर्यंत पडलेला पाऊस (२४९६.५४) मिलिमीटर असून, २००९ सालापेक्षा थोडासा जास्त असला तरी या दहा वर्षात दुसऱ्यांदा पर्जन्यमान कमी झालेले आहे.
या दहा वर्षाच्या कालावधीत २०११ साली सर्वाधिक पाऊस (सरासरी ४६८० मिलिमीटर) झाला होता. म्हणजेच शासकीय प्रमाणकापेक्षा १३१६ मिलिमीटरने अधिक झाला होता. २००७, २०१० आणि २०१३ सालीही पर्जन्यमान शासकीय प्रमाणकापेक्षा ७०० मिलिमीटरपेक्षा अधिक सरासरीने पडला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात दशकभरात यंदा कमी पाऊस पडला. पाच वषार्नंतर ही वेळ आल्याने आॅक्टोबरमध्येच पुढील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. दशकभरात २०११ साली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडल्याने त्यावेळी ठिकठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. यंदा उशिरा पाऊस सुरू झाला. आॅक्टोबरमध्येही पाऊस पडत राहिला असला तरी शासकीय प्रमाणकानुसार यंदा पाऊस कमी पडला. या कमी पावसाचा परिणाम गंभीर होऊ शकेल. (प्रतिनिधी)
दशकभराचे पर्जन्यमान
सनआॅगस्टसप्टेंबर
२००४२९६१३२७८
२००५३२४०३९१३
२००६३१८८३७९५
२००७३३८२४१६५
२००८२६२५३३५५
२००९२२८२२८३७
२०१०३४५६४१३०
२०११४१३५४६८०
२०१२३०२५३५८६
२०१३३७५०४११६
२०१४२४९७३११६
शासकीय प्रमाणकापेक्षा कमी पाऊस.
चार महिन्यांत ३३६४ मिलिमीटर पाऊस.
२०११ साली पडला होता सर्वाधिक पाऊस.
यंदाच्या कमी पावसामुळे पाणी टंचाईची भीती.