शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : जिल्ह्याचे ठिकाण सोडून महाआॅनलाईन खेड्यात, माहितीचा अधिकारात माहिती उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 16:48 IST

रत्नागिरी : जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून रत्नागिरीकडे पाहिले जात असल्याने याठिकाणी सर्व सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. मात्र, जिल्ह्यातील आॅनलाईनचे काम पाहणारे महाआॅनलाईनचे कार्यालय मात्र संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथे कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण सोडून अन्यत्र हे कार्यालय नेण्यामागचे नेमके कारण काय? असा सवाल ...

ठळक मुद्देकोसुंब येथील कार्यालयाबाबत गौडबंगाल महाआॅनलाईनचे कार्यालय संगमेश्वरात सुरू करण्यामागचे कारण काय? महाआॅनलाईनच्या जिल्हा व्यवस्थापकांचे अद्याप दुर्लक्षच रत्नागिरी जिल्ह्याचे ठिकाण असल्याने सर्व कार्यालये एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयात महाआॅनलाईनची केवळ कंट्रोल रूम अस्तित्वात

रत्नागिरी : जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून रत्नागिरीकडे पाहिले जात असल्याने याठिकाणी सर्व सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. मात्र, जिल्ह्यातील आॅनलाईनचे काम पाहणारे महाआॅनलाईनचे कार्यालय मात्र संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथे कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण सोडून अन्यत्र हे कार्यालय नेण्यामागचे नेमके कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व शासकीय कामे आॅनलाईन करण्याची घोषणा केली आहे. डिजिटल इंडिया असा नारा दिल्यानंतर देशातील बहुतांशी कामे आॅनलाईन पद्धतीने करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याच अनुशंगाने महाराष्ट्र सरकारने डिजिटल महाराष्ट्र धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व सुविधा नागरिकांना एकाच छताखाली मिळण्यासाठी महाआॅनलाईन प्रणाली राबविण्यात येत आहे. या प्रणालीमार्फत नागरिकांना सर्व सुविधा देण्याचे धोरण आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली रत्नागिरी जिल्ह्यातदेखील ही सेवा देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोल रूम निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणाहून जिल्ह्यातील सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवले जात आहे.जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोल रूम असली तरी महाआॅनलाईनचे कार्यालय मात्र जिल्ह्याचे ठिकाण सोडून अन्यत्र कार्यरत असल्याची माहिती माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली आहे. हे कार्यालय संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथे कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलेल्या पत्राच्या उत्तरात म्हटले आहे.

हे कार्यालय संगमेश्वरसारख्या ठिकाणी असल्याने महाआॅनलाईन संदर्भात काही काम असल्यास कोसुंबसारख्या ठिकाणी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातच महाआॅनलाईनचे काम पाहणारी व्यक्ती ही रत्नागिरीत १२ नंतर उपलब्ध होत असल्याने सकाळच्या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात महाआॅनलाईनमार्फत विविध दाखले देण्याचे काम गेले काही महिने सुरू होते. मात्र, या पोर्टलवरून मिळणारे दाखले विलंबाने मिळत असल्याने नागरिकांना दाखल्यांसाठी वाट पाहावी लागते. याबाबत महाआॅनलाईनच्या जिल्हा व्यवस्थापकांचे अद्याप दुर्लक्षच होत आहे. महाआॅनलाईनचे काम संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथून चालवले जात आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनRatnagiriरत्नागिरी