शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग खड्ड्यात, बांधकाम खाते अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 14:42 IST

road, ratnagiri, kolhapur, sefty, highway कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा प्रमुख महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग १६६कडे पाहिले जाते. कोल्हापूरहून कोकणात होणारी बहुतांश वाहतूक रत्नागिरी - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरून होते. २४ तास सुरू असणारा हा महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर या संपूर्ण महामार्गाची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्दे रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग खड्ड्यात

सागर पाटीलटेंभ्ये : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा प्रमुख महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्ग १६६कडे पाहिले जाते. कोल्हापूरहून कोकणात होणारी बहुतांश वाहतूक रत्नागिरी - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरून होते. २४ तास सुरू असणारा हा महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर या संपूर्ण महामार्गाची दुरवस्था झाली आहे.१३१ किलोमीटरच्या प्रवासात प्रवाशांना जवळपास हजार खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. काही खड्डे १५ ते २० सेंटीमीटर खोल गेले आहेत. या राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे जोखमीचे बनले आहे. याचा सर्वाधिक प्रतिकूल परिणाम अत्यवस्थ रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्ण वाहिकांना बसत आहे.

अशा परिस्थितीतही बांधकाम खाते खड्डे भरण्याची तसदी घेताना दिसत नाही. शासन व प्रशासन यापैकी कोणालाही या महामार्गाच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.रत्नागिरी - कोल्हापूर - सोलापूर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग १६६ म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गावर काही मूलभूत समस्या जाणवत आहेत. सातत्याने होणारे अपघात लक्षात घेता हा महामार्ग अपघातांचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जात आहे.

या समस्या दूर करण्यासाठी शासन व्यवस्था अथवा बांधकाम खाते यापैकी कोणीही विशेष प्रयत्न करत नसल्याचे या महामार्गावरील स्थानिक लोकांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

यावर्षी कोविड आजाराच्या प्रादुर्भावामुळे जवळपास मार्च महिन्यापासून आजपर्यंत या महामार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक चालू असल्याचे पाहायला मिळत नाही. असे असताना पाली ते मलकापूर या अंतरात अनेक खड्डे पडले आहेत. आंबा ते मलकापूर या दरम्यानही अनेक खड्डे आहेत. खड्डे हे बहुतांश वळणावर पडले असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे.वळणावर खड्डेकोल्हापूर - सांगली व उर्वरित पश्चिम महाराष्ट्रासह बेळगाव येथून रत्नागिरी व विशिष्ट कोकणात होणारी बहुतांश वाहतूक या राष्ट्रीय महामार्गावरून होते. हा महामार्ग चोवीस तास सुरू असतो. या महामार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते.अपघाताला आमंत्रककोकणात व विशेषत: रत्नागिरीमध्ये पर्यटन व देवदर्शनासाठी जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या महामार्गावर सातत्याने गर्दी असते. वाहतूक व अपघाताचे प्रमाण लक्षात घेता महामार्गाचे चौपदरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीpwdसार्वजनिक बांधकाम विभाग