शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : चिपळुणात पाच कात उत्पादकांची तपासणी, १६ टन खैर लाकूडसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 17:06 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडनाका येथे ठाणे वन विभागाच्या भरारी पथकाने खैर लाकडाची चोरटी वाहतूक करणारा ट्रक पकडला. या कारवाईत १६ टन खैर लाकूडसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत १० लाख रुपये असल्याची माहिती ठाणे विभागीय वन अधिकारी संतोष सस्ते यांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील पाच कात उत्पादकांच्या व्यवसायाची तपासणी सुरू आहे.

ठळक मुद्देचिपळुणात पाच कात उत्पादकांची तपासणीकारवाईत १६ टन खैर लाकूडसाठा जप्त

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडनाका येथे ठाणे वन विभागाच्या भरारी पथकाने खैर लाकडाची चोरटी वाहतूक करणारा ट्रक पकडला. या कारवाईत १६ टन खैर लाकूडसाठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत १० लाख रुपये असल्याची माहिती ठाणे विभागीय वन अधिकारी संतोष सस्ते यांनी दिली. त्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील पाच कात उत्पादकांच्या व्यवसायाची तपासणी सुरू आहे.या कारवाईत पकडण्यात आलेल्या संशयिताने दिलेल्या माहितीनुसार ठाणे व कोल्हापूर वन विभागाच्या पथकाने चिपळूण तालुक्यातील सावर्डेसह निवळी येथील पाच कात उत्पादकांच्या येथे छापे टाकून खैर लाकूडसाठ्याची तपासणी सुरु केली आहे. यामध्ये सावर्डे येथील सचिन पाकळे यांच्या सचिन कात इंडस्ट्रीजचा समावेश आहे.

वनक्षेत्र अधिकारी विश्वास भंडाळे यांनी पथकासह कोलाडनाका येथे सापळा रचून एका ट्रकची झडती घेतली असता, ट्रकमध्ये खैर लाकडाचा बेकायदासाठा आढळला. या ट्रकमधून शासकीय जंगलातील खैराची वाहतूक होत होती. याप्रकरणी सावर्डे येथील इरफान खलपे याला शासकीय जागेतील खैर लाकडाची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.यापूर्वी निवळी (ता. चिपळूण) येथील कात उत्पादकांना शासकीय जागेतील खैराचे लाकूड दिल्याचे खलपे याने वन विभागाला सांगितले. त्यानुसार वन विभागाने खातरजमा करण्यासाठी बुधवारी सावर्डे व निवळी येथे छापे टाकले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता सचिन कात इंडस्ट्रीजचे सचिन पाकळे यांच्यासह अन्य काही व्यावसायिक वन विभागाच्या कार्यालयावर धडकले.यावेळी त्यांनी कोल्हापूर येथील विभागीय वन अधिकारी प्रकाश बागेवाडी व ठाणे विभागीय वन अधिकारी संतोष सस्ते यांच्याशी कात उत्पादकांवर चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कारवाईबाबत चर्चा केली. पाच विशेष पथकांनी सचिन पाकळे, पराग लोकरे, मनोज डिके, महेंद्र सुर्वे, रमेश रेपाळ यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी ही चौकशी सुरु असल्याची माहिती सस्ते यांनी दिली. 

टॅग्स :Crimeगुन्हाforest departmentवनविभागRatnagiriरत्नागिरी