शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

रत्नागिरी : मानकऱ्यांची खूणही पालखीने शोधली, पूर येथील शिमगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 13:14 IST

संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील सोमेश्वर, केदारलिंग, पावणाई व विठ्ठलाई ग्रामदेवतेच्या पालखीने आदल्या दिवशी मानकऱ्यांनी लपवून ठेवलेली खूण पन्नास मिनिटांमध्ये शोधून भाविकांना आपल्या शक्तीची प्रचिती दिली आहे. खुणा काढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी मोठी जत्राही भरली होती.

ठळक मुद्देमानकऱ्यांची खूणही पालखीने शोधली, पूर येथील शिमगोत्सव- भाविकांना आली शक्तीची प्रचिती, हजारो भक्तगणांची हजेरी

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील सोमेश्वर, केदारलिंग, पावणाई व विठ्ठलाई ग्रामदेवतेच्या पालखीने आदल्या दिवशी मानकऱ्यांनी लपवून ठेवलेली खूण पन्नास मिनिटांमध्ये शोधून भाविकांना आपल्या शक्तीची प्रचिती दिली आहे. खुणा काढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी मोठी जत्राही भरली होती.कोकणात शिमगोत्सवानंतर खुणा काढण्याची प्रथा पूर्वापार रूढ आहे. खुणा काढण्याच्या दिवशी उत्सवाला उधाण येते. शिमगोत्सवात कोणतीही चूक न होता, कार्य निर्विघ्नपणे पार पडले याची साक्ष ग्रामदेवता यावेळी पटवून देते. त्याचप्रमाणे पूर येथील ग्रामदेवतेची पालखी खुणा काढण्याच्या ठिकाणी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ढोलताशांच्या गजरात नाचविण्यास प्रारंभ करण्यात आला. पालखी लपवलेल्या खुणेचा शोध घेत होती, यावेळी सर्व भाविकांच्या नजरा त्याकडे लागून राहिल्या होत्या.पन्नास मिनिटांच्या कालावधीत पालखीने खूर मारून खूण शोधून काढली. यावेळी भाविकांनी ग्रामदेवतेच्या नावाने एकच जल्लोष केला. प्रमुख झेपले व वेले मानकऱ्यांच्या उपस्थितीत ही खूण बाहेर काढण्यात आली.

हा क्षण पाहण्यासाठी स्थानिक व मुंबईकर भाविकांची एकच गर्दी झाली होती. यानिमित्त आयोजित जत्रेठिकाणी दुकानदारांनी सकाळपासूनच दुकाने थाटली होती. त्यामुळे मिठाई, शीतपेय, शोभेच्या वस्तू असलेल्या दुकानांनी संपूर्ण परिसर फूलून गेला होता.खुणा काढून झाल्यानंतर पालखी नाचवत वाजतगाजत मंदिरात नेण्यात आली. त्यानंतर रूपे काढून शिमगोत्सवाची सांगता झाली. पूर ग्रामस्थांच्या एकोप्याचे दर्शन यावेळी घडले. शिमगोत्सव शांततेत पार पडल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTempleमंदिर