शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : वाहतूक पोलिसाचा प्रामाणिकपणा, पोलिसांची प्रतिमा उंचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:16 IST

वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येते. रत्नागिरी वाहतूक शाखेतील पोलीस सुभाष शिरधनकर यांनीही एका प्रसंगातून असाच प्रामाणिकपणा दाखवून पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.

ठळक मुद्देप्रामाणिकपणा दाखवून पोलिसांची प्रतिमा उंचावलीरस्त्यात पडलेला मोबाईल केला परत रेझिंग डेनिमित्त घडला अनोखा उपक्रम

रत्नागिरी : वाहतूक पोलीस हा कायमच साऱ्यांच्या टिकेचा धनी. त्याने शिस्त दाखवली तरी त्याच्यावर टीका आणि त्याने कोणाला कारवाई न करता कोणाला सोडून दिले तरी त्याने चिरीमिरी घेतल्याची टीका. पण वाहतूक पोलीसही माणसेच असतात आणि अनेक प्रसंगात त्यांची माणुसकी, त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येते.

रत्नागिरी वाहतूक शाखेचे पोलीस सुभाष शिरधनकर यांनीही एका प्रसंगातून असाच प्रामाणिकपणा दाखवून पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.रत्नागिरीच्या जेलनाका भागात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरूणाचा मोबाईल खाली पडला. काहीतरी रस्त्यावर पडल्याचे  वाहतूक शाखेतील पोलीस वाहतूक पोलीस शिरधनकर यांच्या लक्षात आले.

तो मोबाईल असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वाहतूक शाखेचे निरीक्षक अयुब खान यांना हा प्रकार सांगितला. मोबाईलवरील दूरध्वनी क्रमांकांशी संपर्क साधत त्यांनी हा मोबाईल कोणाचा आहे, याची माहिती मिळवली.रत्नागिरीच्या गवळीवाडा येथे राहणाऱ्या रोहीत कैलास आठवले याचा हा मोबाईल असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. अर्धा ते पाऊण तासात रोहीत आठवले यांना त्यांचा रस्त्यात पडलेला मोबाईल परत मिळाला.

आठवले हे रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारी आहेत. त्यांच्या मोबाईलची किंमत ५२ हजार रूपये इतकी आहे. आठवले यांनी त्यासाठी देऊ केलेले बक्षिसही शिरधनकर यांनी नाकारले. रेझिंग डेनिमित्त पोलीस अनेक उपक्रम करतात. त्याचदिवशी हा अनोखा उपक्रम घडला आणि पोलिसांची मान उंचावली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtraffic policeवाहतूक पोलीस