शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : कोकण विभागीय मंडळासमोर उत्तरपत्रिकांची होळी, कृती समिती आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:47 IST

विनाअनुदानित शाळांच्या अनुदानपात्र याद्या त्वरित घोषित करून त्यासंबंधी आर्थिक तरतूद करून १०० टक्के पगार सुरू करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये कृती समितीच्यावतीने गुरुवारी शासनाचा निषेध करण्यासाठी येथील कोकण विभागीय मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे रत्नागिरीत कोकण विभागीय मंडळासमोर उत्तरपत्रिकांची होळी, कृती समिती आक्रमकविनाअनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये कृती समिती आक्रमक

रत्नागिरी : विनाअनुदानित शाळांच्या अनुदानपात्र याद्या त्वरित घोषित करून त्यासंबंधी आर्थिक तरतूद करून १०० टक्के पगार सुरू करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये कृती समितीच्यावतीने गुरुवारी शासनाचा निषेध करण्यासाठी येथील कोकण विभागीय मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक उत्तरपत्रिकांची होळी करण्यात आली.२० फेब्रुवारीपर्यंत सर्व विनाअनुदानित शाळांच्या अनुदानपात्र याद्या कोणत्याही परिस्थितीत घोषित केल्या जातील, असे आश्वासन शिक्षणमंत्री यांनी दिले होते. मात्र, दोन दिवस उलटूनही ते अद्याप पाळले नाही. त्यामुळे कृती समितीने येथील कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करून निषेध नोंदविला.यावेळी विभागीय मंडळाचे पदाधिकारी शेख यांना निवेदन देऊन उपस्थित विनाअनुदानित शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अंतिम मार्ग म्हणून २१ फेब्र्रुवारीपासून सुरू झालेल्या बारावी परीक्षेला काळ्या फिती लावून काम करण्यास सुरूवात केली आहे. यापुढेही उत्तरपत्रिका तपासणी कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ फेब्रुवारपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर समितीतर्फे २७ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केले जाणार आहे.या आंदोलनावेळी कृती समितीचे अध्यक्ष महेंद्र जाधव, सुकुमार शिंदे, अमोल यादव, राहुल यादव, सुयोग तांबे, सानिका शेलार, अनिकेत गुरव, नीलेश कातकर, अभिजीत सुर्वे, परमेश्वर केंद्रे, प्रकाश फराटे, संदीप कुराडे, हिंदुराव कांबळे उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षाTeacherशिक्षक