शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : महामार्ग होणार चौपदरी; अजून पूल मात्र दुपदरीच, पुलाची कामे मात्र संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:03 IST

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. जिल्ह्यात रत्नागिरी वगळता अन्य भागांमध्ये चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. मात्र, महामार्गावरील पुलांच्या बांधकामांना अद्याप वेग आलेला नाही.

ठळक मुद्देमहामार्ग होणार चौपदरी; अजून पूल मात्र दुपदरीच, पुलाची कामे मात्र संथ मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण वेगात सुरू

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. जिल्ह्यात रत्नागिरी वगळता अन्य भागांमध्ये चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. मात्र, महामार्गावरील पुलांच्या बांधकामांना अद्याप वेग आलेला नाही.

काही पूल अपूर्ण स्थितीत असून, बहुतांश पुलांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे हे पूल दुपदरीच आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.सन २०१३मध्ये मंजूर झालेल्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पासाठी गेल्या वर्षी भूसंपादन करण्यात आले. त्यानंतर चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण ते आरवली व लांजा ते राजापूर या विभागात चौपदरीकरणाचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे.

मात्र, आरवली ते वाकेड या मार्गावरील चौपदरीकरण काम सर्वाधिक मागे आहे. चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यात बंद राहणार आहे. त्यानंतर पुन्हा चौपदरीकरणाच्या कामाला वेग येणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून या चौपदरीकरणाच्या प्रक्रियेतील अनंत अडथळे पार करीत महामार्ग चौपदरीकरणाची गाडी पुढे रेटली जात आहे. राज्यातील अन्य महामार्गांचे चौपदरीकरण झाले असताना मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाकडे दुर्लक्ष झाले होते. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाला चालना दिली. त्यामुळेच हा मंजूर प्रकल्प पुढे सरकला.

सुमारे १२ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च या चौपदरीकरणाला येणार आहे. हे चौपदरीकरण २०१८मध्ये पूर्ण होईल, असेही घोषित करण्यात आले होते. त्यासाठी मंत्री गडकरी यांनी वर्षभर जोरदार पाठपुरावाही केला. परंतु हे काम गतीने पुढे सरकले नाही. गेल्या सहा महिन्यांपासून हे चौपदरीकरणातून कॉँक्रीटीकरणाचे हे काम वेगाने सुरू आहे.

कशेडी पायथा (ता. खेड) ते राजापूर तालुक्यातील तळगावपर्यंत या महामार्गाची हद्द असून, हे अंतर २०६.३ किलोमीटर आहे. या महामार्गाची सध्याची रूंदी ३० मीटर्स असून, चौपदरीकरणात ती ६० मीटर्स होणार आहे.१८९ गावांमधील जागेचे संपादनरायगड जिल्ह्यातील ४५, रत्नागिरीतील १०४ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० मिळून महामार्ग चौपदरीकरणासाठी या तीनही जिल्ह्यातील १८९ गावांतील वाढीव जमीन घेण्यात आली आहे.

रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जमिनीखालील केबल्स, रोहित्र, भारत संचार निगमचे खांब, जलवाहिन्यांचे स्थलांतर सध्या केले जात आहे. वनविभागाची चौपदरीकरण जागेत येणारी ३४,०६५ झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.बावनदी पूल जैसे थेमहामार्गावरील महत्त्वाचा असलेला बावनदी पूल हा ९२ वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात उभारण्यात आला होता. हा पूल आता कमकुवत झाला आहे. महामार्ग चौपदरीकरणात हा पूल नव्याने उभारला जाणार आहे.

मात्र, महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असताना बावनदीच्या पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे २०१९मध्ये चौपदरी महामार्गावरून वाहतूक सुरू झाली तरी महामार्ग चौपदरी व पूल दुपदरी अशी स्थिती होणार काय, असा सवालही केला जात आहे. महामार्गावरील अनेक छोट्या-मोठ्या मोऱ्यांचे कामही अजून झालेले नाही.१४ महत्वाच्या पुलांचे काम ठप्पमुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पूल हे ब्रिटिशकालीन आहेत. या पुलांची मुदत संपली आहे. चौपदरीकरण प्रकल्पाअंतर्गत महामार्गावरील महत्त्वाच्या १४ पुलांचे कंत्राट एका ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष काम करणाऱ्या उपठेकेदारांना रुपयाही न मिळाल्याने त्यांनी काम बंद केले. परिणामी अर्धवट स्थितीत हे पूल आहेत. जिल्ह्यातील शास्त्रीपूलाचे कामही ठप्प झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी हे काम पुन्हा सुरू झाले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग