शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘रत्नागिरी हापूस’ स्थानिक बाजारपेठेत दाखल, गतवर्षीपेक्षा एक महिना उशिरा एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:31 IST

बदलत्या वातावरणाचा आंबा पिकाला बसला फटका

मेहरून नाकाडेरत्नागिरी : नैसर्गिक दृष्टचक्रातून शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नाने वाचलेला रत्नागिरी हापूस अखेर शुक्रवारी (दि. ६ मार्च) रत्नागिरीच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल एक महिना उशिराने आंबाबाजारात आला असून, प्रमाणही अल्प असल्याचे विक्रेते सतीश पवार यांनी सांगितले.नोव्हेंबरपर्यंत पडलेला पाऊस, ऑक्टोबर हीटचे अल्प प्रमाण, डिसेंबरपासून सुरू झालेली थंडी अशा बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसला. त्याचबराेबर पावसासह थंडीचे सर्वाधिक प्रमाण राहिल्याने फुलोरा मोठ्या प्रमाणावर आला. मात्र, अति थंडीमुळे अपेक्षित फळधारणा झाली नाही. शिवाय थंडीमुळे आलेला मोहर काळा पडून गळून गेला. सद्य:स्थितीत १० ते १५ टक्के इतकाच आंबा झाडावर आहे. शिवाय गेल्या काही दिवसात उष्मा वाढल्यामुळे आंबा भाजू लागला आहे.नैसर्गिक संकटातून बचावलेला आंबा तयार होऊ लागला आहे. पावस (ता. रत्नागिरी) येथील बागायतदारांनी शुक्रवारी तोड केलेला आंबा सतीश पवार यांच्या स्टाॅलवर विक्रीसाठी पाठविला आहे. सध्या दोन ते अडीच हजार रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. गतवर्षी सुरुवातीला तीन हजार ते साडेतीन हजार रुपये डझन दर हाेता. मात्र, आंब्याची आवक कमी असल्याने पवार यांच्या स्टाॅलवर पहिलीच आवक अडीच डझन एवढीच झाली आहे.

पायरी, रायवळ कैरी उपलब्धरत्नागिरीतील पवार यांच्या स्टाॅलवर देवगड हापूस, पायरी तसेच रायवळ कैरीही विक्रीसाठी उपलब्ध आहे. पायरी १८०० ते दोन हजार रूपये डझन, तर कैरी १२० ते १५० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे.

गेली ४५ वर्षे हा व्यवसाय करीत आहाेत. यावर्षी प्रथमच आंबा कमी असून, विक्रीसाठी आंबा उशिरा दाखल झाला आहे. एकूणच उत्पादन कमी असल्यामुळे आंबा विक्रीला कमी असेल. आंबा कमी असल्यामुळे दर टिकतील अशी अपेक्षा आहे. - सतीश पवार

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Alphonso Arrives Late to Market, Supply Limited

Web Summary : Ratnagiri Alphonso mangoes arrived a month late due to weather, with low yields. Prices are ₹2,000-2,500 per dozen. Other varieties are also available.