रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ‘उत्कष्ट संसदपटू’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:25+5:302021-07-09T04:21:25+5:30

रत्नागिरी : राज्याचे परिवहन आणि संसदीय व्यवहार मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांना २०१५-२०१६ या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा ...

Ratnagiri Guardian Minister Anil Parab awarded 'Outstanding Parliamentarian' award | रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ‘उत्कष्ट संसदपटू’ पुरस्कार

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ‘उत्कष्ट संसदपटू’ पुरस्कार

रत्नागिरी : राज्याचे परिवहन आणि संसदीय व्यवहार मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांना २०१५-२०१६ या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. पावसाळी अधिवेशनानंतर आयोजित सत्कार सोहळा विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पर्यटन व पर्यावरण व पर्यावरण बदल मंत्री आदित्य ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपेदेखील उपस्थित होते. विधान परिषदेचे एकूण १२ सदस्य आणि विधानसभेच्या सहा सदस्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

--------------------------

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना २०१५ - २०१६ या वर्षासाठी ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़.

Web Title: Ratnagiri Guardian Minister Anil Parab awarded 'Outstanding Parliamentarian' award