शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत पालख्या, भेटीचा अभूतपूर्व सोहळा, फेडले डोळ्यांचे पारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:58 IST

बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. जाकीमिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा व सडामिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा यांच्या पालख्या श्री भैरी मंदिरात आल्या असताना दोन्ही पालख्यांची भेट मंदिराच्या आवारात झाली. दोन्ही पालख्यांच्या भेटीचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली होती.

ठळक मुद्देबारा वाड्यांचे ग्रामदैवत पालख्याभेटीचा अभूतपूर्व सोहळाफेडले डोळ्यांचे पारणे

रत्नागिरी : बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. जाकीमिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा व सडामिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा यांच्या पालख्या श्री भैरी मंदिरात आल्या असताना दोन्ही पालख्यांची भेट मंदिराच्या आवारात झाली. दोन्ही पालख्यांच्या भेटीचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली होती.शुक्रवार, २ रोजी श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात मुरूगवाडीतील मंडळी आल्यानंतर पहाटे ३ वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून श्री भैरीची पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगाव सहाणेवरुन झाडगाव नाका, टिळक आळी, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर, बंदररोड मार्गे पहाटे ५ वाजता मांडवी भडंग नाका येथे आली. 

पुढे प्रत्येकी एक-एक तास याप्रमाणे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडेवठार, खडपेवठार मागील समुद्रमार्गे जाऊन खडपेवठारातून गोडीबाव तळ्यावर सकाळी १० वाजता आली. तेथून तेली आळी भागातून, राम नाका, राम मंदिर येथे सकाळी ११.३० वाजता येईल. तेथून पुढे राधाकृष्ण नाका, गोखले नाका येथे दुपारी १२ वाजता आली. तेथून पुढे लक्ष्मी चौक, झाडगावमार्गे मुरूगवाडा घसरवाट येथे राजेंद्र महादेव सुर्वे यांच्या कंपाऊंडमध्ये होळी घेण्यासाठी आली.

तेथून परत होळीचा शेंडा घेऊन दुपारी ३ वाजेपर्यत झाडगाव येथे सहाणेवर जाऊन होळी उभी करण्यात आली. रात्री ९ वाजता धूळवड साजरी करण्यासाठी श्रीदेव भैरीचे निशाण सहाणेवरून काढण्यात आले. झाडगावात फिरून श्री देवी जोगेश्वरी मंदिरात, तेथून सहाणेच्या मागील बाजूने झाडगावकर कंपाऊंडमध्ये जाऊन कुंभारवाड्यातून परटवणे फगरवठार येथून परत फिरून निशाण वरच्या आळीतून, लक्ष्मी चौक, गोखले नाक्यातून ढमालनीच्या पारावर होळी घेण्यासाठी आली.

रात्री ११.३० वाजता ढमालनीच्या पारावरून निशाणाचे तीन भाग करण्यात आले. तेथून राजिवड्यातील चव्हाण यांच्या घराशेजारी मुस्लीम मानकरी काद्र्री यांना देवस्थानकडून श्रीफळ देऊन गळाभेट होऊन तेथे धूळवड साजरी करण्यात आली.फाल्गुन पौर्णिमेला मध्यरात्री बारा वाजता श्री देव भैरीची पालखी श्री देवी जोगेश्वरी भेटीसाठी बाहेर पडली. तत्पूर्वी भैरी भेटीला जाकीमिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबाची पालखी आली होती. सडामिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबाची पालखी श्री भैरी मंदिरातून बाहेर पडली. दोन्ही पालख्यांची भेट श्री भैरी मंदिराच्या प्रांगणात झाली. 

टॅग्स :Holi 2018होळी २०१८Ratnagiriरत्नागिरी