शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  घरफोडीच्या गुन्ह्यातील ४ जणांची टोळी ६ महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:30 IST

रत्नागिरी शहरामध्ये राहणाऱ्या व घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशानुसार ९ डिसेंबर २०१८ पासून जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

ठळक मुद्देघरफोडीच्या गुन्ह्यातील ४ जणांची टोळी जिल्ह्यातून तडीपार६ महिन्यांसाठी कारवाई

रत्नागिरी : रत्नागिरी शहरामध्ये राहणाऱ्या व घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशानुसार ९ डिसेंबर २०१८ पासून जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये आकिब जिक्रिया वस्ता (२१, राजिवडा), मकबुल सलाउद्दीन दावत (१९, राजिवडा, रत्नागिरी), उजैफ तन्वीर वस्ता (१९, राजिवडा, आदमपूर, रत्नागिरी), मोहम्मद अदनान इरफान वस्ता (१९, लिमयेवाडी, कर्ला, रत्नागिरी) यांचा समावेश आहे. त्यांना रविवारी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी शहर पोलीस स्थानकाला परिणामकारक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुन्हेगारांची अद्ययावत यादी पोलिसानी बनवली.

त्यानुसार रत्नागिरी शहराअंतर्गत गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या कारवाईअंतर्गत या चार जणांच्या टोळीला जिल्ह्यातून हद्दपार करावे, अशी मागणी करणारा प्रस्ताव शहर पोलीस स्थानकातून जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आला होता.त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी आवश्यक चौकशी केली व या टोळीच्या हद्दपारीची शिफारस केली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रविवारी या टोळीची हद्दपारी जाहीर करून गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस