शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : घरफोड्या करणारे ४ चोरटे गजाआड, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 17:11 IST

चिपळूणमध्ये ५ जुलै २०१८ रोजी भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले आहे. पेण येथून होंडा सिटीने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ४ चोरट्यांना गुन्हा अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून होंडा सिटी गाडीसह सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ८ लाख १८ हजार ३७० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देघरफोड्या करणारे ४ चोरटे गजाआडस्थानिक गुन्हा अन्वेषणची कामगिरी८ लाख १८ हजार ३७० रुपयांचा ऐवज हस्तगत

रत्नागिरी : चिपळूणमध्ये ५ जुलै २०१८ रोजी भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले आहे. पेण येथून होंडा सिटीने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ४ चोरट्यांना गुन्हा अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून होंडा सिटी गाडीसह सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ८ लाख १८ हजार ३७० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.संशयित आरोपींमध्ये ज्ञानेश्वर अप्पादुराई शेट्टी (३५, रा. गणराज पॅलेस, रुम नं. ४०१, दिवा, जि. ठाणे, मूळ रा. तामिळनाडू), नासिर खान इसाक खान पठाण (३९, रा. नाझिया मंजील, नरिमलनगर, जालना), मुकेश भागोजी बाळसराफ (३४, रा. आंबिवली, नवनाथ कॉलनी, माणी, ता. कल्याण. मूळ रा. जुन्नर, पुणे), रवी रामचंद्र शेट्टीयार (३४, रा. वागळे इस्टेट रोड, शिवशक्तीनगर, जि. ठाणे, मूळ रा. तामिळनाडू) यांचा समावेश आहे.चिपळूण व खेड पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये वाढलेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रणय अशोक व अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची २ पोलीस पथके तयार करून त्यांच्याकडे घरफोड्यांचा तपास सोपवला होता.पोलिसांचे पथक मुंबई येथे जात असताना पेण (जि. रायगड) या ठिकाणी हॉटेल हीमगौरीनजीकच्या मोकळ्या जागेमध्ये एक काळ्या रंगाची होंडा सिटी गाडी (एमएच ०१-एएच - ५८६४) उभी असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. वाहनाची झडती घेतली. त्यावेळी चालकाच्या सीटच्या खाली स्क्रूड्रायव्हर, अ‍ॅडजस्टेबल पाना, कटावणी इत्यादी हत्यारे दिसून आली. तसेच गाडीमधील एका स्टीलच्या डब्यात सोन्याचे दागिने सापडले आहेत.या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष माने, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय कांबळे, राकेश बागुल, दिनेश आखाडे, उदय वाजे, विजय आंबेकर, रमीज शेख, चालक दत्ता कांबळे यांनी सहभाग घेतला होता.स्थानिकांनी पाहिलेल्या गाडीवरून मागचिपळूणमधील हा गुन्हा करताना आरोपींनी एमएच ०१ पासून सुरू होणाऱ्या नंबरची काळ्या रंगाची होंडा सिटी स्थानिकांनी पाहिली होती. त्यावरुन गुन्हेगार हे मुंबई किंवा ठाणे परिसरातील असावेत, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक रायगड, ठाणे, मुंबई या परिसरात पाठविण्यात आले होते. पोलिसांचा हाच अंदाज खरा ठरला. 

टॅग्स :Crimeगुन्हाRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस