शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : लांजा शहरात चार फ्लॅट फोडले, पोलिसांसमोर आव्हान, दोन ठिकाणीच चोरटे यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 16:11 IST

एकाच रात्री चोरट्यांनी लांजा शहरातील कुंभारवाडी येथे असलेल्या साई समर्थ प्लाझा व राजयोग पार्क या दोन इमारतींमधील एकूण चार बंद फ्लॅट फोडले. यावेळी दोन फ्लॅटमधून २१ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरुन नेण्यास चोरटे यशस्वी झाले असले तरी राजयोग पार्कमधील फ्लॅटमध्ये काहीच हाती न लागल्याने चोरट्यांची निराशा झाली.

ठळक मुद्दे लांजा शहरात चार फ्लॅट फोडले पोलिसांसमोर आव्हान, दोन ठिकाणीच चोरटे यशस्वी

लांजा : एकाच रात्री चोरट्यांनी लांजा शहरातील कुंभारवाडी येथे असलेल्या साई समर्थ प्लाझा व राजयोग पार्क या दोन इमारतींमधील एकूण चार बंद फ्लॅट फोडले. यावेळी दोन फ्लॅटमधून २१ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरुन नेण्यास चोरटे यशस्वी झाले असले तरी राजयोग पार्कमधील फ्लॅटमध्ये काहीच हाती न लागल्याने चोरट्यांची निराशा झाली. ऐन पावसाळ्यात चोरांनी डोके वर काढल्याने शहरवासीय धास्तावले आहेत.रत्नागिरी, चिपळूण, खेड येथे बंद फ्लॅट फोडून चोरीचे सत्र सुरु असतानाच मंगळवारी रात्री चोरट्यांनी लांजा शहराकडे आपला मोर्चा वळवला. या आधीही ऐन पावसाळ्यात लांजा शहरामध्ये दुकाने फोडून चोऱ्या झाल्या असल्याने शहरातील दुकानदार धास्तावले आहेत.

शहरातील कुंभारवाडी येथील साई समर्थ प्लाझा येथील दुसऱ्या मजल्यावर दिलीप काशिनाथ कशेळकर (६४) याचा बी विंगमध्ये १०४ नंबरचा फ्लॅट आहे. मंगळवारी कशेळकर हे आपल्या जुन्या घरी राहण्यासाठी सायंकाळी ७.३० वाजता गेले होते. यावेळी त्यांच्याशेजारी असलेले डॉ. अनिल कदम हेदेखील घरी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून फ्लॅटमध्ये प्रवेश केला.

यावेळी कशेळकर यांच्या घरातील कपाट फोडून त्यातील ९ हजार रुपये लंपास केले. त्यानंतर डॉ. अनिल कदम यांच्या फ्लॅटकडे चोरट्यांनी मोर्चा वळवला. कदम यांच्या घरातील १२ हजार रुपये रोख तसेच कानातील सोन्याच्या रिंग व अंगठी असा एकूण २१ हजार रुपयांचा ऐवज घेऊन जाण्यात चोरटे यशस्वी झाले.दोन फ्लॅट फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा महामार्गावर कोर्ले फाटा येथे असलेल्या राजयोग पार्क या इमारतीकडे वळवला. येथील सन इलेक्ट्रॉनिक हे दुकान फोडले. यावेळी या दुकानाच्या गल्ल्यात असलेली २०० रुपयांची चिल्लर चोरट्यांनी चोरून नेली. त्यानंतर याच बिल्डिंगमधील बी विंगमधील विश्वनाथ मांगले व शरीफ लांजेकर यांचे बंद फ्लॅट फोडले. मात्र, याठिकाणी कोणीही राहत नसल्याने चोरट्यांच्या हात हालवत माघारी फिरावे लागले.सकाळी ७ वाजता कशेळकर व डॉ. कदम हे आपल्या फ्लॅटवर आल्यानंतर त्यांना आपले फ्लॅट फोडल्याचे दिसून आले. तसेच राजयोग पार्क इमारतीतील सन इलेक्ट्रॉनिक व अन्य दोन फ्लॅट फोडल्याचेही दिसून आले. दिलीप कशेळकर यांनी लांजा पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.

चोरीची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मारूती जगताप, पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी शांताराम पंदेरे, बळवंत शिंदे यांनी पंचनामा केला तसेच रत्नागिरी येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.

रत्नागिरीहून माही हे श्वान घेऊन सुध्देश सावंत, जीवन जाधव, चालक ए. एस. सुर्वे यांचे पथक लांजात दाखल झाले होते. यावेळी श्वानाने मुंबई - गोवा महामार्गापर्यंत चोरट्यांचा माग काढला.भीतीचे वातावरणयावेळी श्वान प्रथम कशेळकर यांच्या फ्लॅटनंतर डॉ. कदम यांचा फ्लॅट, त्यानंतर सन इलेक्ट्रॉनिक, राजयोग पार्कमधील बी विंगमधून सरळ महामार्गावर आले. त्यानंतर चोरट्यांनी याठिकाणाहून गाडीचा वापर केल्याचे दिसून आले. त्यापुढे श्वानाला चोरट्यांचा माग काढणे शक्य झाले नाही. या चोरीमुळे भीतीचे वातावरण आहे. 

टॅग्स :crimeगुन्हेRatnagiriरत्नागिरी