शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  चाफेतील मांजरेकर कुटुंब प्रथम मानकरी, कन्या वन समृध्दी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:47 IST

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कन्या वन समृध्दी योजनेची पहिली मानकरी रत्नागिरी तालुक्यातील चाफे - वरचीवाडी येथील माधवी मोहन मांजरेकर यांची कन्या ठरली आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागातर्फे मांजरेकर कुटुंबाला दहा रोपे भेट देण्यात आली असून, मांजरेकर कुटुंबियांनी त्यांच्या जागेत या झाडांची लागवड केली आहे.

ठळक मुद्देचाफेतील मांजरेकर कुटुंब प्रथम मानकरी, कन्या वन समृध्दी योजना सामाजिक वनीकरण विभागातर्फे केले होते आयोजन

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कन्या वन समृध्दी योजनेची पहिली मानकरी रत्नागिरी तालुक्यातील चाफे - वरचीवाडी येथील माधवी मोहन मांजरेकर यांची कन्या ठरली आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागातर्फे मांजरेकर कुटुंबाला दहा रोपे भेट देण्यात आली असून, मांजरेकर कुटुंबियांनी त्यांच्या जागेत या झाडांची लागवड केली आहे.चाफे - वरचीवाडी येथील माधवी मांजरेकर यांच्या सर्व्हे क्रमांक १४२/२ या क्षेत्रात वनीकरण विभागाने दिलेल्या साग, काजू, आंबा, जांभूळ अशा दहा रोपांची लागवड करण्यात आली आहे. वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेत्तर क्षेत्र वृक्षलागवडीखाली आणण्याबरोबरच ज्या शेतकरी कुटुंबांमध्ये मुलगी जन्माला येईल, अशा दाम्पत्यांना दहा रोपे विनामूल्य दिली जाणार आहेत. पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इत्यादीबाबत सध्याच्या व भावी पिढीमध्ये आवड व रूची निर्माण करण्याचा उद्देश यामागे आहे.या योजनेतून मुलगा आणि मुलगी समान असून, महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी सामाजिक संदेश देणे, मुलींच्या घटत्या संख्येवर अशा योजनांद्वारे काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे हादेखील कन्या वन समृध्दी योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाव नोंदणी केल्यानंतर विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते.

ज्या शेतकरी दाम्पत्याला मुलगी होईल, त्या दाम्पत्याने मुलीसाठी तिच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यात दिनांक १ ते ७ जुलैअखेर दहा झाडे लावण्याची संमत्ती अर्जाद्वारे द्यावी. तसेच वृक्षारोपणासाठी दहा खड्डे खोदून ठेवणे आवश्यक आहे.सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेतून या दाम्पत्याला दहा रोपे ग्रामपंचायतीमार्फत दिली जाणार असून, त्यामध्ये पाच साग रोपे, दोन आंबा रोपे, फणस, जांभूळ, चिंच यांचे प्रत्येकी एक रोप दिले जाणार आहे. लागवडीनंतर या रोपांचे फोटो काढून शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीला सादर करावयाचे आहेत.

ग्रामपंचायतींनी ही सर्व माहिती एकत्रित करून तालुकास्तरावरील वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण विभाग यांना दिनांक ३१ जुलैपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न हे मुलीचा कौशल्य विकास, उच्चशिक्षण आणि रोजगार मिळवणे व मुलींच्या उज्वल भविष्यासाठी शेतकºयांना त्यांच्या ऐच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा राहणार आहे. 

टॅग्स :environmentवातावरणRatnagiriरत्नागिरी