शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : थ्रीप्समुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा धोक्यात, बागायतदारही संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 12:48 IST

थ्रीप्सचा प्रादुर्भाव महागडी कीटकनाशके वापरूनही आटोक्यात येत नसल्याने बागायतदारही संकटात.

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा हातात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, थ्रीप्सचा प्रादुर्भाव महागडी कीटकनाशके वापरूनही आटोक्यात येत नसल्याने बागायतदारही संकटात आहेत.

यावर्षी सर्वाधिक पालवीचे प्रमाण राहिले. ८० टक्के पालवी असल्याने शेतकरी पालवी कडक होऊन मोहर येण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे थंडी पडलीच नाही. पहिल्या टप्प्यातील आंबा पीक दहा टक्केच होते. हा आंबा तयार होऊन बाजारात आला आहे. हा आंबा अल्प प्रमाणात आहे. १५०० ते ४५०० रूपये पेटी दराने विक्री सुरू आहे. एप्रिल अखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात असला तरी याचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात मोहरच आला नाही. शेवटच्या टप्प्यात असलेल्या मोहराला फळधारणा झाली. मात्र, हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला. तुडतुड्यामुळे मोहर काळवंडला असून, थ्रीप्समुळे फळाचा आकार चिकू एवढा होऊन फळ गळही वाढली आहे.

संशोधन करणे आवश्यकमहागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही थ्रीप्स आटोक्यात येत नसल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा हातातून निसटला आहे. आतापर्यंत पीक वाचविण्यासाठी केला खर्च वाया गेल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. थ्रीप्स आटोक्यात न आल्यास पुढील वर्षीच्या उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. याबाबत कृषी विभागाकडून संशोधन करणे आवश्यक आहे.थ्रीप्समुळे आंबा उत्पादन धोक्यात आले आहे. बाजारात थ्रीप्स प्रतिबंधात्मक कीटकनाशके उपलब्ध आहेत. महागडी कीटकनाशकांची फवारणी करूनही अपेक्षित फरक दिसत नाहीत. त्यामुळे कृषी विद्यापीठाने थ्रीप्सबाबत संशोधन करून प्रतिबंधात्मक कीटकनाशक बाजारात आणणे आवश्यक आहे.राजन कदमबागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा