रत्नागिरीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:29 IST2020-12-01T16:28:45+5:302020-12-01T16:29:43+5:30
Ratnagiri Nagar Parishad, muncipalcarporation रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची मंगळवारपासून अमलबजावणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता शहरातील मारूती मंदिर येथून फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केल्यानंतर काही तासातच शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

रत्नागिरीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरु
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची मंगळवारपासून अमलबजावणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता शहरातील मारूती मंदिर येथून फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केल्यानंतर काही तासातच शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
मंगळवार सकाळपासून रस्त्यावरील फुटपाथवर असणारीअतिक्रमणे, टपऱ्या हटवण्यासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज झाली होती. सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. सकळाी मारुती मंदिर येथील टपऱ्या उचलण्यात आल्या आहेत. यासाठी जेसीबी, इतर गाड्यांचा वापर करण्यात आला आहे.
या कारवाईतून ग्रामीण भागातून टोपलीतून भाजी घेऊन येणाऱ्या भाजी विक्रेत्या महिलांना सूट देण्यात आली आहे. मात्र, हातगाडी, टपरी टाकून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अतिक्रमणे हटवण्याची ही मोहीम अशीच सुरू राहील, असे रत्नागिरी नगर परिषदेचे आरोग्य सभापती राजन शेट्ये यांनी सांगितले आहे.
नगर परिषदेने केवळ रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या हातगाडीवाले, फळविक्रेते यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला पक्के बांधकाम केलेल्यांना अभय दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हातावर पोट घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून नगर परिषद काय साध्य करत आहे, असा प्रश्न केला जात आहे.