शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

  रत्नागिरी : सेवा समाप्तीचा आदेश कर्मचाऱ्यांनी झुगारला,  आंदोलन तीव्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:44 IST

सेवा समाप्तीचा जिल्हा परिषद प्रशासनाचा आदेश झुगारून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे. पुढील टप्प्यातील लाँग मार्च आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २५० कंत्राटी कर्मचारी नाशिकला रवाना झाले आहेत. अनेक अधिकारी कामावर हजर झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देअधिकारी फुटले, कर्मचारी आंदोलनात, इतर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती एनआरएचएचच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरुच, लाँग मार्चसाठी जिल्ह्यातील २५० कर्मचारी नाशिकला रवाना १८ मेपासून नाशिक ते मुंबईपर्यंत लाँगमार्च

रत्नागिरी : सेवा समाप्तीचा जिल्हा परिषद प्रशासनाचा आदेश झुगारून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे. पुढील टप्प्यातील लाँग मार्च आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २५० कंत्राटी कर्मचारी नाशिकला रवाना झाले आहेत. अनेक अधिकारी कामावर हजर झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.शासनाने मागण्या मान्य न केल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या या १२०० कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. ते पहिल्या टप्प्यातील आंदोलनासाठी परिषद भवनासमोर बसले होते. त्यानंतरही शासनाने दखल न घेता उलट त्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली.येत्या ४८ तासात कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्त करण्यात येईल, अशी नोटीस बुधवारी या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना बजावण्यात आली होती. नोटीसकडे दुर्लक्ष करुन एनआरएचएमच्या राज्य संघटनेच्या आदेशाचे पालन करीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले बेमुदत कामबंद आंदोलन सुरुच ठेवले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसमुळे जिल्ह्यातील सुमारे ४५ अधिकारी गुरुवारपासून कामावर रूजू झाले.प्रशासनाने बजावलेल्या सेवा समाप्तीच्या नोटीसला न जुमानता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी नाशिकच्या दिशेने पावले उचलली आहेत. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून हे कर्मचारी नाशिक ते मुंबई असा १८ ते २८ मे लाँग मार्च काढणार आहेत. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे २५० कंत्राटी कर्मचारी रवाना झाले. ते खासगी गाड्या, रेल्वेने निघाले आहेत.आंदोलन सुरुचकाही जिल्ह्यांमध्ये शासनाने दिलेला आदेश झुगारून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरूच ठेवल्याने त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी न घाबरता आंदोलन सुरू ठेवले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषदHealthआरोग्य