शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

रत्नागिरी :ईडूच्या संचालकाला अखेर अटक,कोट्यवधीचा गंडा, पोलीसकोठडीत ठेवण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:29 IST

आॅनलाईन जाहिरातीवर क्लिक करुन पैसे कमवण्याचा फंडा गुंतवणूकदारांच्या चांगलाच अंगाशी आला असून, चिपळूण पोलिसांनी ईडूचा संचालक रविकिरण याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून सायबर क्राईमच्या कर्मचाऱ्यांना बोलावून ईडूच्या सर्व संगणकांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांच्या पोलिसांवर विश्वास नाहीआयुष्यभराची पुंजीची कंपनीत गुंतवणूकतपास सुरु होताच गुंतवणूकदारांची ईडूच्या कार्यालयासमोर गर्दी

चिपळूण : आॅनलाईन जाहिरातीवर क्लिक करुन पैसे कमवण्याचा फंडा गुंतवणूकदारांच्या चांगलाच अंगाशी आला असून, चिपळूण पोलिसांनी ईडूचा संचालक रविकिरण याला  अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून सायबर क्राईमच्या कर्मचाऱ्यांना बोलावून ईडूच्या सर्व संगणकांची तपासणी करण्यात आली. दिवसभर पोलिसांची धावपळ सुरु होती. पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांच्याकडे हा तपास असल्याने सायबर क्राईमच्या कर्मचाऱ्यांनी तपासासाठी आवश्यक असणारी माहिती उपलब्ध करुन दिली आहे. दुपारनंतर रविकिरण याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.ईडूच्या लॉगिन आयडीच्या माध्यमातून १० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रति जाहिरात ७ रुपये मिळणार होते. या पद्धतीनुसार २ आयडीवर १ हजार रुपये मिळतील, असे सांगण्यात आले होते. ही गुंतवणूक चेन व बायनरी स्वरुपाची असून, जेवढे आयडी होतील तेवढा फायदा होईल, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे जादा पैसे मिळण्याचा मोह गुंतवणूकदारांना झाला. त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. काहींनी तर दागिने गहाण ठेवून पैशांच्या लोभापायी गुंतवणूक केली.

सुरुवातीच्या काळात काही लोकांना या कंपनीकडून चांगला नफा मिळाला. त्यामुळे वर्षभरात कंपनीचा बोलबाला झाला व जादा पैशांच्या आमिषाने लोकांनी गुंतवणूक केली. आता कंपनीवर गुन्हा दाखल झाल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. परंतु, कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपले पितळ उघडे पडू नये म्हणून अनेक गुंतवणूकदार तोंड लपवून बसले असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मिसर करीत आहेत.पोलिसांवर विश्वास नाहीईडूसारख्या अनेक मार्केटिंग कंपन्या आतापर्यंत आल्या आहेत. एकाही कंपनीचे कार्यालय आज दिसत नाही. सुरुवातीला मोठा फायदा दिसतो व त्यानंतर पदरी तोटा येतो व निराशा होते, असे अनेक प्रकार आतापर्यंत उघडकीस आले आहेत. असे असताना लोक मोहाला बळी पडतात. अशा बोगस कंपन्यांवर विश्वास ठेवू नये, यासाठी आपण दोन ते तीनवेळा बैठका घेतल्या. परंतु, लोक पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवत नाहीत, हे दुर्दैव आहे, असे मिसर म्हणाले.आयुष्यभराची पुंजीचेन पद्धतीने ग्राहक गोळा करुन त्याचा लाभ मिळवून देणाऱ्या अनेक कंपन्या आतापर्यंत येऊन गेल्या. सुरुवातीच्या काळात या कंपन्या पहिल्या ग्राहकाला त्याचा फायदा करुन देतात. त्यामुळे साहजिकच गुंतवणूकदारांचा कंपनीवर विश्वास बसतो. आज पैसे हेच सर्वस्व झाल्याने पैशाचा मोह सर्वांना पडतो व आपल्याला जादा पैसे मिळावेत, या अपेक्षेने आपली आयुष्यभराची पुंजी लोक अशा कंपनीत गुंतवताना दिसतात.गुंतवणूकदारांची गर्दीईडू अ‍ॅण्ड अर्न कन्सलटन्सी या कंपनीचे संचालक रविकिरण बटुला यांच्याविरुध्द मंगळवारी सायंकाळी इम्तियाज मुकादम यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांचा तपास सुरु केला.

दरम्यान, ईडूवर गुन्हा दाखल झाल्याची चर्चा सुरु होताच गुंतवणूकदारांना धक्का बसला. या गुंतवणूकदारांनी दुपारपर्यंत ईडूच्या कार्यालयासमोर गर्दी केली. यावेळी संचालक रविकिरण बटुला हे घटनास्थळी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तातडीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. 

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस