शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जप्त मासेमारी बोट, डिझेल टँकरचा होणार लिलाव, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:24 IST

रत्नागिरी : डिझेलच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी जप्त करण्यात आलेली डिझेल टँकर व मासेमारी बोटचा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या आदेशानुसार ...

रत्नागिरी : डिझेलच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी जप्त करण्यात आलेली डिझेल टँकर व मासेमारी बोटचा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या आदेशानुसार इसेन्शिअल कमोडिटी ॲक्ट १९५५ अंतर्गत लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव ९ रोजी सकाळी ११:३० ते दुपारी १ या वेळेत दाभोळ सागरी पोलिस स्थानक येथे होणार आहे.लिलावासाठी मालमत्तेचे मूळ मूल्यांकन मासेमारी बोटीकरिता मत्स्य व्यवसाय विभाग आणि डिझेल टँकर करिता प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. लाकडी व फायबर मासेमारी बोट (आयएनडी-एमएच-३-एमएम-६८५८)चा लिलाव हाेणार असून अंदाजित मूल्य (बाजारभावानुसार) ९ लाख ४१ हजार ६१८ रुपये आहे. ही मासेमारी बोट सध्या दाभोळ बंदर येथे ठेवण्यात आलेली आहे.तसेच डिझेल टँकर (एमएच ४६, बीएम ८४५७) चा लिलाव करण्यात येणार आहे. हा टॅंकर २०१९मधील असून, अंदाजित मूल्य (बाजारभावानुसार) १४.७५ लाख रुपये इतका आहे. सध्या हा टँकर दाभोळ पोलिस स्थानकात ठेवण्यात आलेला आहे.हा लिलाव ‘जशी आहे, तशी स्थिती’ या तत्त्वावर करण्यात येईल. सहभागी होणाऱ्यांनी लिलावापूर्वी दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. यशस्वी बोलीदाराने लिलावास्थळी एकूण बोलीच्या २५ टक्के रक्कम धनादेशाद्वारे तत्काळ व उर्वरीत रक्कम धनादेशाद्वारे सात दिवसात भरावी लागेल.जिल्हाधिकारी यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतीही बोली नाकारण्याचा व लिलाव रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. सर्व सहभागींनी वैध ओळखपत्र (पॅनकार्ड/आधारकार्ड) व दोन पासपोर्ट साइज फोटो आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी किंवा lcb.ratna@mahapolice.gov.in येथे संपर्क साधावा.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी