शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट!
3
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
4
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
5
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
6
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
7
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
8
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
9
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
10
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
11
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
12
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
13
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
14
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
15
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
16
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
17
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
18
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
19
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
20
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल

रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात साकारली पहिली साैरऊर्जेवरील नळपाणी याेजना, लवकरच लाेकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 15:35 IST

योजनेची चाचणी यशस्वी

प्रशांत सुर्वेमंडणगड : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली साैरऊर्जेवर आधारित नळपाणी योजना मंडणगड तालुक्यातील पालघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत केळवत या ठिकाणी साकारण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाले असून, या योजनेची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. या याेजनेचे लवकरच लाेकार्पण करण्यात येणार आहे.वीजबिल किंवा थकबाकी या डाेकेदुखीतून सुटका हाेण्यासाठी केळवत गावातील ग्रामस्थांनी साैरऊर्जेवर आधारीत नळपाणी याेजना यशस्वी करण्याचा निर्धार केला. गावातील नळपाणी याेजनेच्या पुनर्दुरुस्तीसाठी एक लाख चार हजार ४०० रुपये एवढा निधी खर्ची घालण्यात आला आहे. या याेजनेतून ७७ कुटुंबांना वैयक्तिक नळ जाेडणी देण्यात आली असून, एक लाख ४० हजार इतकी लाेकवर्गणी जमा करण्यात आली आहे. ही रक्कम पाणीपुरवठा स्वच्छता समितीच्या नावे ठेवण्यात आली आहे. याेजनेसाठी पाच एच.पी. साेलर बसविण्यात आले आहेत.    नळपाणी योजनेसाठी आवश्यक असलेल्या विजेसाठी सौरऊर्जेचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे  भविष्यात ही योजना कार्यरत राहण्यासाठी  वीजबिल देयक किंवा थकबाकी हा प्रश्न उद्भवणार नाही.  त्यामुळे ती चिंता मिटली आहे. तसेच या योजनेसाठी बसवण्यात आलेल्या पॅनेलची देखभाल व दुरुस्ती  पाच वर्षे पॅनेल बसविणारी  कंपनीच करणार आहे. योजनेचे ऑपरेटींग व मॅनेजमेंटसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ ग्रामपंचायत स्तरावर निर्माण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.जिल्ह्यातील पहिलीच साैरऊर्जेवरील ही नळपाणी याेजना असून, या याेजनेची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीवेळी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता प्रतिभा शेरकर, अभियंता विष्णू पवार, जिल्हा समन्वयक कुमार शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी