मतदार जागृती प्रचार प्रसिद्धीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

By शोभना कांबळे | Published: January 23, 2024 05:50 PM2024-01-23T17:50:34+5:302024-01-23T17:51:14+5:30

जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांना उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार; उद्या मुंबईत वितरण 

Ratnagiri District Collector Office is first in the state in promoting voter awareness campaign | मतदार जागृती प्रचार प्रसिद्धीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

मतदार जागृती प्रचार प्रसिद्धीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

रत्नागिरी : मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणुकीतील सहभाग (SVEEP) उपक्रम राबवून मतदार यादी दुरुस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी कोकण विभागातून रत्नागिरीचेजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची निवड करण्यात आलेली आहे. मुंबईत २४ रोजी या पुरस्काराचे वितरण राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.

त्याचबरोबर उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, तसेच रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांचीही उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार २०२४ साठी निवड करण्यात आलेली आहे. तसेच उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कोकण विभागातून चिपळूणचे उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांची निवड करण्यात आली आहे.

उत्कृष्ट समाजमाध्यम पुरस्कार २०२४ साठी समाजमाध्यमांद्वारे उत्कृष्ट प्रचार-प्रसिद्धीकरिता राज्यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयास प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यासाठी समाजमाध्यम समन्वयक वैभव विजय आंबेरकर यांची निवड करण्यात आलेली आहे. पारितोषिक वितरण २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबई चर्चगेट येथील जयहिंद कॉलेज येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. २५ जानेवारी रोजी १४ वा राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम संपूर्ण राज्यभर साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये २०२३-२४ या वर्षभराच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून निवडणूक विषयासंदर्भात केलेल्या उल्लेखनीय व नावीन्यपूर्ण कामगिरीच्या आधारे राज्यातीलबअधिकाऱ्यांची संस्थांची तसेच व्यक्तींची राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पारितोषिक व सत्कारासाठी राज्यस्तरावरून निवड करण्यात आली आहे.

Web Title: Ratnagiri District Collector Office is first in the state in promoting voter awareness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.